मांडवा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या!!

Dec 20, 2025 - 15:05
 0  7
मांडवा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या!!

दैनिक जागर मराठी 
संतोष राठोड 
दिग्रस :   तालुक्यातील मांडवा येथे एका २८ वर्षीय युवकाने घरातच दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मंगळवार सुमारे ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पुंडलिक बाळू गजभारे (२८, रा. मांडवा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सदर युवकाने घरात गळफास घेतल्याचे नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ दिग्रस पुंडलिक गजभारे १६ डिसेंबर रोजी सकाळी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. सदर मृतकाने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पुढील तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई, एक भाऊ व चार बहिणी असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी दिग्रस पोलिस ठाण्यातआकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी रवींद्र जगताप पुढील तपास करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow