महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, अख्खा बीआरएस पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

Sep 30, 2024 - 18:29
 0  103
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, अख्खा बीआरएस पक्ष शरद पवार गटात होणार विलीन?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पक्ष आता शरद पवार गटात विलीन होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी येत्या 6 तारखेला पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करतील, असं सूत्रांचं म्हणणं आहे. राज्यातील बीआरएस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. यानंतर ही माहिती समोर आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow