मनसेची सत्ता यावी, शिर्डीच्या तरुणाची कोल्हापूर ते शिवतीर्थ पदयात्रा, राज ठाकरेंसमोर लोटांगण !!

Mar 31, 2025 - 09:11
 0  32
मनसेची सत्ता यावी, शिर्डीच्या तरुणाची कोल्हापूर ते शिवतीर्थ पदयात्रा, राज ठाकरेंसमोर लोटांगण !!

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समर्थकांची संख्या राज्यात कमी नाही. राज ठाकरेंची सत्ता महाराष्ट्रात येण्यासाठी शिर्डी येथील तरुणाने कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरापासून राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानापर्यंत पदयात्रा केली. त्यानंतर गुढीपाडव्याच्या  मुहूर्तावर त्याने राज ठाकरेंची भेट घेत लोटांगण घातलं. या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे.

शिर्डीच्या तरुणाची पदयात्रा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सत्ता महाराष्ट्रात येण्यासाठी शिर्डी येथील प्रमोद आरणे या महाराष्ट्र सैनिकाने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरापासून ते शिवतीर्थ, दादरपर्यंत पायी चालत “पक्षध्वज पायी संकल्प यात्रा” काल पूर्ण केली. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिक प्रमोद आरणे याची शिवतीर्थ येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या, असे कॅप्शन देत अमित ठाकरे यांनी इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

तर भाजपला मनसेचा पाठिंबा

दरम्यान, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ‘विधानसभा निवडणुका होऊन गेल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्रासारखे सुसंस्कृत राज्य आले आहे. चांगल्या पद्धतीने जर मराठी माणसाकडे लक्ष देणार असाल, तर आमचा तुम्हाला पाठिंबा राहील. प्रत्येक गोष्ट समजून करा,’ अशी भूमिका राज ठाकरे यांनी रविवारी मांडली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow