मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी; महिला आयोगाचा अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची दखल...
पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी चौकशी समितीने दिलेल्या अहवालाबाबत तसंच राज्य शासनाने दिलेल्या अहवालाबाबत माहिती दिली. त्यांनी अहवालाचं वाचन केलं.चौकशी समितीने दिलेल्या अहवालाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, 'पोलीस आयुक्त, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित राहण्याआधी मी भिसे कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली.
त्यांनी याबाबत काही गोष्टी सांगितल्या
भिसे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी शेअर करतात, कारण चांगली ट्रिटमेंट मिळावी. या रुग्णाची ट्रिटमेंट डॉक्टर घैसास यांच्याकडे सुरू होती, १५ मार्च रोजी रुग्ण आणि डॉक्टरांची पहिली भेट झाली होती. यावेळी डॉक्टरांनी रुग्णाची संपूर्ण हिस्ट्री सांगण्यात आली होती. रुग्णाची मेडिकल हिस्ट्री केवळ डॉक्टरला माहिती होती. पण घटना घडल्यानंतर दिनानाथ रुग्णालयाला चौकशीसाठी स्वत:ची समिती नेमली आणि त्यात अहवाल दिला. त्या अहवालात रुग्णालयाने स्वत:ला वाचवण्यासाठी रुग्णाच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोपनीय गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या. त्याचा निषेध करते. याबाबत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला समज दिली जाईल. यावर कुटुंबाने आक्षेप घेतला असून तसं लेखी पत्र आयोगाला दिलं आहे. तसंच यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. या आढावा बैठकीत यावर चर्चा झाली.'
What's Your Reaction?








