प्रिय धर्माबादकर मतदार बंधू आणि भगिनीनो

Dec 6, 2025 - 16:43
 0  5
प्रिय धर्माबादकर मतदार बंधू आणि भगिनीनो

दैनिक जागर मराठी  
नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड धर्माबाद नगरपरिषद  पंचवीस ते तीस वर्षाचा कालखंड म्हटलं तर खूप कमी आणि म्हटलं तर खूप जास्त पण आहे एखाद्या मेट्रोसिटी चा विकास करण्यासाठी हा कालखंड खूपच कमी आहे पण 50 ते 60 हजार लोक वस्ती असलेल्या शहराचा विकास करण्यासाठी जिद्द मनात ठरवली तर पाच वर्षे पण पुरेसे आहेत. तीही सलग पंचवीस ते तीस वर्षे मिळाली तर विकासासाठी खूप मोठा कालखंड मानला जातो. मायबाप धर्माबाद करांनो आपण सर्वांनी मिळून अनेक पक्षांना भरभरून साथ दिली व त्यांच्या हातात सत्ता दिली पूर्ण बहुमताने त्यांना सत्तेवर बसवले एवढ्याच एका अपेक्षेने की विकास कामे होत राहतील किमान दैनंदिन गरजा तरी योग्य पद्धतीने राबविल्या जातील पण केवळ सत्तेवर येईपर्यंत भुलथाप देणाऱ्या या पक्षांनी शहराची विकास कामे तर जाऊच द्या पण शासनाकडून आलेल्या विकास कामाच्या अनुदानातही कमिशन रुपी पैसे छापण्याची मशीन जणू पंचवीस वर्षे चालू ठेवली पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता या दैनंदिन आवश्यक गरजा पुरविणाऱ्या सर्व योजनांचा बट्ट्याबोळ केला केवळ स्वतःच फायदा करून घेण्यासाठी या योजनेतील निधीचा वापर केला जलशुद्धीकरणाचे टाकी, धर्माबाद शहरातील प्रमुख रस्ते धर्माबाद रत्नाळी व बाळापूर व धर्माबाद ला जोडणारा रस्ता अशा अनेक प्रकारची विकास कामे आहेत जी फक्त पैशाच्या हवाशापोटी विकास निधीची विल्हेवाट लावली आपणास माहीत असेल प्रसिद्ध ट्रॅक्टर ट्रॉली घोटाळा, नगरपालिका बोगस प्रमाणपत्र घोटाळा, नगरपालिकेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, एल ई डी सोलार लाईट घोटाळा अशा अनेक प्रकरणाच्या माध्यमातून धर्माबाद नगरपरिषदेचे व धर्माबाद शहराचे नाव बदनाम करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला होत. प्रशासकीय कामात सतत जनतेची पिळवणूक केली. नाव परिवर्तन, वारसा हक्क प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, घरकुल योजना, शौचालय बांधण्यासाठी अनुदान या सर्व कामात अगोदर मला काय मिळते या भावनेने लोकांवर अन्याय केले लोकांना सर्वसामान्य जनतेला अक्षरशा भेटीस धरले. सतत 25 वर्ष हा विकासाचा कालखंड केवळ आणि केवळ वाट पाहण्यातच गेला पण आता पुन्हा वेळ आलेली आहे नवीन परिवर्तनाची एक नवीन दृष्टिकोन घेऊन जन्माला आलेली मराठवाडा जनहित पार्टी धर्माबाद शहराच्या विकासाची ब्लू प्रिंट मनाशी बाळगून आपल्या समोर उभी आहे. आम्ही मराठवाडा जनहित पार्टीच्या रुपाने वरील सर्व अशा अनेक समस्यांची उत्तर घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्रातील एकमेव आदर्श नगरपरिषद करण्याचा आमचा मानस आहे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतभवानी  र्माबाद नगरपरिषद -2025 वचननामा.

* धर्माबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध प्रिय धर्माबादकरांनो आपल्या शहराचा सर्वांगीण, सुशोभित आणि शाश्वत विकास हा आमचा ध्यास आहे. आधुनिक सुविधा, स्वच्छता, रोजगार, शिक्षण आणि संस्कृती यांचा संगम असलेले नवे धर्माबाद घडविण्याचे आमचे ठाम वचन आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिक सक्षम, सुंदर आणि प्रगत शहर निर्माण करण्यासाठी खालील प्रमुख संकल्पनांसह आम्ही आपल्या--समोर हा विकास वचननामा सादर करत आहोत.

1) सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती धर्माबाद शहरात उद्योग व व्यावसायिक प्रकल्प उभारण्यासाठी विशेष योजना राबवून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल.

2) शहरात नवीन अंगणवाड्यांची स्थापना वाढत्या लोकसंख्येनुसार विविध भागात अंगणवाड्या उभारून लहानग्यांसाठी पोषक, सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यात येईल.

3) भूमिगत ड्रेनेज लाईन - गटारीमुक्त धर्माबाद शहरातील सर्व गटारी बंद करून आधुनिक भूमिगत ड्रेनेज प्रकल्प राबवला जाईल, ज्यामुळे शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी बनेल

4) पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र तरुणांना मोफत मार्गदर्शन मिळावे यासाठी नगरपरिषदेतर्फे पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र सुरु केले जाईल. 5) शहरात आकर्षक बाल उद्यान लहान मुलांसाठी आधुनिक खेळणी, रनिंग ट्रॅक, हिरवाईने नटलेले बाल उद्यान तयार करून कुटुंबांसाठी सुरक्षित मनोरंजन स्थळ उपलब्ध केले जाईल

6) बाळापुर रस्त्यावर भव्य मुख्य प्रवेशद्वार बाळापुर गावाकडे जाणान्या रस्त्यावर शहराची ओळख असलेले आकर्षक मुख्य प्रवेशद्वार उभारले जाईल. 7) रेल्वे स्टेशनवर भव्य कमान रेल्वे स्टेशन परिसरात धर्माबादच्या वैमवाची कथा सांगणारी, आकर्षक कमान बांधून शहराची ओळख अधिक दृढ करण्यात येईल.

8) भवानी माता मंदिर परिसराचा विकास वनविभाग व नगरपरिषद यांच्यात करार करून भवानी माता मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येईल

9) अत्याधुनिक डिजिटल ग्रंथालय विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी व नागरिकांसाठी वाय-फायसह आधुनिक डिजिटल ग्रंथालय

सुरू करून ज्ञानाचा मुक्त प्रवेश दिला जाईल.

10) स्वच्छ, सुंदर आणि आदर्श धर्माबाद शहर सर्व प्रभागांत आधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली लागू नियोजनबद्ध स्वच्छता मोहिम व घरगुती कचरा संकलनाची शंभर टक्के अंमलबजावणी नाल्यांची नियमित साफसफाई, डास नियंत्रण मोहीम आणि

धूळमुक्त रस्ते करण्याची मोहीम हिरवाई वाढवण्यासाठी हरित धर्माबाद अंतर्गत रोपलागवड व उद्यानांचे विकासकाम 11) 100% संगणकीकृत्त, पारदर्शक नगरपरिषद धर्माबाद नगरपरिषद पूर्णपणे संगणक प्रणालीशी जोडून डिजिटल नगरपरिषद करण्याची हमीसर्व कर, नकाशे, जन्म-मृत्यू दाखले, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स यांची ऑनलाइन सुविधा भ्रष्टाचारमुक्त जलद प्रशासनासाठी ई-गव्हर्नन्सची अमलबजावणी नागरिकांना घरबसल्या सेवा मिळाव्यात यासाठी स्मार्ट नागरिक सेवा केंद्र सुरू करणे,

 12) रत्नाळी बाळापूर धर्माबाद सह शहरातील प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काचे घर मिळावे म्हणून धर्माबाद महाराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार धर्माबाद शहरात म्हाडाच्या धरतीवर शासनाच्या जागेची उपलब्धता करून भव्य घरकुल योजना राबवण्याचा आमचा संकल्प

13) रत्नाळी व बाळापूर गावठाण मधील जुने घरे आजही आजोबा व पणजोबाच्या नावाने असून ती वारसा प्रमाणे वारसदारांच्या नावावर करण्यासाठी विशेष मोहीम राबवणा

14) रत्नाळी तलावांचे संवर्धन व "विनायक सरोवर प्रकल्प रत्नाळी येथील छोटा तलाव व मोठा तलाव यांचे वैज्ञानिक पद्धतीने पुनर्विकासजलसंधारण, बंधारे, पाणी साठवण क्षमतेत वाढ आणि तटबंदी मजबूत करणे. पर्यटकांना आकर्षित करणारे सुंदर पथवे, लाइटिंग, बसण्याच्या जागा, व्यायाम साहित्य बसवणे. या संपूर्ण प्रकल्पाला एकत्रितरित्या विकसित करून "विनायक सरोवर निर्माण करण्याचा भव्य उपक्रम तलाव सुशोभीकरणामुळे शहरातील जलस्रोत वाढणार, पर्यावरण सुधारेल आणि धर्माबादला नवी ओळख मिळेल. आपल्या विश्वासाने आम्ही धर्माबादला आधुनिक, सुरक्षित, स्वच्छ आणि प्रगत शहर बनविण्याचा संकल्प केला आहे. विकासाच्या प्रवासात आम्हाला साथ द्या

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow