प्रज्ञानंद आणि वैशालीच्या यशात "आईचा" मोठा वाटा !!!

Sep 25, 2024 - 11:07
 0  17
प्रज्ञानंद आणि वैशालीच्या यशात "आईचा" मोठा वाटा !!!
प्रज्ञानंद आणि वैशालीच्या यशात "आईचा" मोठा वाटा !!!

           भारताच्या आर प्रज्ञानंदने सुपरबेट जलद आणि अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनवर मात केली. यासह कार्लसन गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्यापासून दूर राहिला. प्रज्ञानंदविरूद्घच्या या खेळाचा कार्लसनवर किती खोल परिणाम झाला हे त्याने स्वत या लढतीनंतर सांगितले.

       भाऊ प्रज्ञानंद पाठोपाठ वैशालीनेही ग्रँडमास्टर किताबावर आपले नाव कोरले आहे. बुद्धिबळाच्या इतिहासात ग्रँडमास्टर किताब मि‌ळवणारे ते पहिलेच बहिण-भाऊ ठरले आहेत.वैशालीने ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक असलेला तिसरा नॉर्म ऑक्टोबरमध्ये झालेल्या कतार मास्टर्स स्पर्धेतच पूर्ण केला होता. मात्र, तिचे एलो गुणांकन २५००पेक्षा कमी होते. त्यामुळे ग्रँडमास्टर किताबासाठी तिला हा टप्पा गाठणे गरजेचे होते. तिने एल्लोब्रेगात स्पर्धेतील कामगिरीमुळे तिचे ‘लाइव्ह रेटिंग’ २५०० झाले आणि तिने ग्रँडमास्टर किताबावर नाव कोरले.

आईची साथ !!

एक स्त्री घराला पुढे नेते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रज्ञानंदची आई नागलक्ष्मी. मुलगी वैशाली आणि मुलगा प्रज्ञानंदला ग्रँडमास्टर बनविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. एका मुलाखतीत नागलक्ष्मी म्हणाल्या, 'प्रज्ञानंद जेव्हा खेळत असतो, तेव्हा माझ्या हृदयाचे स्पंदन तुम्हाला स्पष्टपण ऐकू येतील. तो खेळत असताना मी कधीच त्याच्या डोळ्यात बघत नाही.' विशेष म्हणजे त्यांना बुद्धिबळ हा खेळ अद्यापही पूर्णपणे कळत नाही, पण तरीही त्या त्याला पाठिंबा देत असतात.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow