गोवंश चोरी करणारे आरोपी जेरबंद!!
दैनिक जागर मराठी
अकोट : शहरातील व तालुक्यातील गोवंश चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालली असून या गोवंश चोरीच्या अनेक तक्रारी अकोट शहर व ग्रामीण पोलीसात दाखल आहेत त्या अनुषंगाने दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता च्या सुमारास फिर्यादी नामे अनंत शालीकराम दिडोंकार वय ४७ वर्ष रा. नंदीपेठ अकोट जि. अकोला यांचा धामण्या रंगाचा गोरा (बैल) ज्याचे शिंगे लहान काळया रंगाचे त्याचे तोंडावर काळपट रंगाचा डाग वय अंदाजे १६ महीने शेपटीचा गोंडा काळा अशा वर्णनाचा गोरा तसेच धामण्या रंगाची गाय तीचे शिंगे लहान तीच्या तोडांवर समोर पांढऱ्या रंगाचा डाग लाहान लहान काळया रंगाचे शिंगे शेपटीचा गोंडा काळा वय अंदाजे २७ महीने तसेच एक धामण्या रंगाची गाय शिंगे नसलेली शेपटीचा गोंडा काळा वय अंदाजे ३० महीने अशा वर्णनाच्या गुरे फिर्यादीने त्यांचे गायवाड्या समोर बांधुन फिर्यादी शेतात कामानिमीत्त निघून गेले व संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास परत आले.असता वर नमुद वर्णनाचे जनावरे बांधलेल्या ठिकाणी दिसुन आले नाहीत.आजुबाजुला सुद्धा शोध घेतला असता मिळुन आले नाही. वरून फिर्यादी ने दि ८ डिसेंबर रोजी दिलेल्या जबानी रिपोर्ट वरून पो. स्टे ला अप नं ४८५/२०२५ कलम ३०३ (२) भा. न्या. सं गुन्हा दाखल करून तपासात घेतला.सदर गुन्हा तात्काळ तपासात घेवुन पोलीस स्टेशन अकोट शहर येथील डि. बी पथकाचे अंमलदार पोहेकॉ गणेश सोळंके, नापोकॉ विपुल सोळंके, पोकॉ मोहन दुर्गे, पोकों अश्विन चौव्हाण यांनी गोपनीय माहीतीगाराचे माहिती वरून तात्काळ गुप्त माहिती मिळाली की सदर गुन्हयातील वर नमुद वर्णनाचा गोरा हा कालवाडी रोडने एका टाटा एस गाडीत बसवुन अकोट येथे घेवुन येत आहे. वरून सदर वाहन क्र. एम एच १२ एस एफ ९२८० थांबविले व नमुद वर्णनाचा गोरा गाडीत मिळुन आल्याने गाडीत आरोपी अक्षय अरूण हिंगणकर वय २९ वर्ष रा. संभाजीनगर अकोट, सुरज बाबाराव नेवरकर वय २५ वर्ष रा. कालवाडी ता. अकोट जि. अकोला, प्रेम दर्शन सरकटे वय १८ वर्ष रा. कालवाडी ता. अकोट जि. अकोल तसेच वि.सं.बा यास त्याचे नातेवाईकास समजपत्र देवुन ताब्यात देण्यात आले व तसेच वरील आरोपीतांकडून एक धामणा रंगाचा गोरा किं अंदाजे १२,०००/- रू व एक टाटा एस क्र. एम एच १२ एस एफ ९२८० किं अंदाजे २,००,०००/- रू असा एकुण २,१२,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपीतांना अटक करण्यात आली.सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, मा. सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल माळवे, डि.बी. पथक इंचार्ज पोउपनि वैभव तायडे, पोहेकॉ गणेश सोळंके, नापोकॉ विपुल सोळंके, पोकॉ मोहन दुर्गे, पोकॉ अश्विन चौव्हाण यांनी केली आहे.या घटना चा छडा पोलीस कसुन प्रयत्न करीत आहेत.त्याच्या या कामगीरी प्रशंसा होत आहे.
What's Your Reaction?








