पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ बास्केटबॉल (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित !!

Dec 6, 2025 - 16:23
 0  10
पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ बास्केटबॉल (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित !!

दैनिक जागर मराठी 
मारोती सोनवणे 
अमरावती (प्रतिनिधी) :
               लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, ग्वालियर येथे 23 ते 27 डिसेंबर, 2025 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ बास्केटबॉल (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
               चमूंमध्ये ब्राजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची गौरी भोंडे, आश्लेष रावळे व खुशी तायडे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची सोनाली महातो, प्रेरणा शानिती, रुपमित लिचा व मोनिका मसुंदर, जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारची वेदांती ठाकरे, यामिनी घरत, नेहा पुनवटकर व श्रावणी वडतकर, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावतीची नंदिनी रावळे, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीची दिक्षा दोडके, गौरी मोहोड, प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेराची राजनंदिनी बोदडे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीची अक्षया उंबरीकर हिचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे दि. 11 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow