धर्माबाद नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीला आता नव्याने सुरुवात होत.एकाही उमेदवाराची माघार नाही!!

Dec 11, 2025 - 13:51
 0  10


दैनिक जागर मराठी 

 नांदेड :  धर्माबाद नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीला आता नव्याने सुरुवात होत असून काही तांत्रिक कारणास्तव ऐनवेळी निवडणूक प्रक्रिया मतदानाच्या अवघ्या ४८ तासापूर्वी रद्द करण्यात आली होती.त्यानंतर आता नवीन व्हर्जन २.०नुसार नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमानुसार अर्ज माघार घेण्याची दि.१० दुपारी ३ वाजेपर्यंत होती अन दुपारी ३ पर्यंत एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही, नगराध्यक्ष पदासाठी नऊ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी १२५ उमेदवार रिंगणात आहेत.आता पुनः एकदा ११ प्रभागासाठी व नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांना आता तारेवरचीकसरत करावी लागणार आहे त्यामुळे सर्वच निवडणूक लढवणारे उमेदवार मागील निवडणूक प्रक्रिया ऐनवेळी रद्द झाल्याने मेटाकुटीला जरी आले असले तरी त्यांनी मतदारांना ओली पार्टी चहा पाणी करत आपण कसे निवडून येऊ याकडे लक्ष देत विकास करणारे कारभारी कारभारीन आम्हीच असू असे म्हणत आता जोरदारपणे कामाला लागले आहेत. -शहरातील सर्व उमेदवाराच्या प्रचाराच्या जवळपास प्रत्येकी ४-५ फेऱ्या पूर्ण झाल्या असून देखील उमेदवार प्रत्यक्ष भेटीगाठी बाहेरील मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.येत्या २० डिसेंबर रोजी मतदान होत असल्यामुळे प्रचारात आणखी दहा दिवस एवढा कालावधी शिल्लक आहे पण यापैकी ६० टक्के उमेदवार गरीब परिस्थितीचेअसल्यामुळे अगोदर झालेला खर्च यामुळे आता नव्याने उमेदवारांना आत खर्च करण्यासाठी आर्थिक गणित मांडत आवश्यक असणारा खर्च करावा लागणार आहे? अजून एकदा कार्यकर्ते सांभाळत दारोदारी घरोघरी पोहचावे लागणार आहे तर दुसरीकडे शहरातील मतदार देखील दारात आलेल्याना आमचजी मते तुम्हालाच असे म्हणत उमेदवारांना हिम्मत देत आहेत मात्र मतदार नेमके कुणाला मतदान करणार हे येणारा काळच ठरवणार आहे.सध्या तरी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस, मराठवाडा जनहित पार्टी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना,ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) यांच्यात जोरदार लढत होणार असून काही प्रभागात मात्र अपक्ष देखील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांशी लढत देत असल्याचे चित्र आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow