लोहारी खु येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली !!

Dec 6, 2025 - 17:16
 0  7
लोहारी खु येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली !!

दैनिक जागर मराठी 
तालुका प्रतिनिधी

अकोट:सामाजिक न्याय आणि समतेचे जनक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोहारी खुर्द येथिल जि. प. व. प्राथ. शाळेत आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन व हारार्पण करून झाली.  याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर भाषणे दिली. उपस्थित शिक्षिका कु सोनाली निचळ यांनी “समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वांचे पालन हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना आहे,” असा संदेश दिला. तर रुपाली ढवळे यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे आजच्या समाजजीवनातील महत्त्व, संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान तसेच सामाजिक न्यायाच्या चळवळीत त्यांनी केलेली क्रांतिकारी भूमिका यावर प्रकाश टाकला. मुख्याध्यापक नितीन धोरण यांनी सामाजिक ऐक्य, भेदभावमुक्त समाज आणि ज्ञानाची उपासना हीच डॉ. आंबेडकरांना खरी आदरांजली असल्याचे सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नितीन धोरण  तर प्रमुख अतिथी म्हणून रुपाली ढवळे मॅडम , कु सोनाली निचळ, सोनाली उज्जैनकर, दिव्या डोबाळे, भूजिंगराव इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थीनी कु. सलोनी वानखडे तर आभार प्रदर्शन कु गौरी म्हैसने या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नितीन धोरण, सोनाली उज्जैनकर, रुपाली ढवळे, सोनाली निचळ यांनी परिश्रम घेतले. शेवटी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करण्याची प्रतिज्ञा करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow