जागा वाटपाचा निर्णय होण्यापूर्वीच शरद पवार गटाने डाव टाकला; दोन दिवसांत सहा जाहीरसभा, कोणाचा प्रवेश होणार?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आता शरद पवार गटाकडून २६ व २७ सप्टेंबर रोजी नगर शहरासह विविध तालुक्यात दोन दिवसांत ते सहा ठिकाणी जाहीरसभा घेणार आहेत. या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभा महत्वाच्या ठरणार आहेचत. जागा वाटपात पक्षाकडून दावा केला जात असलेल्या विधानसभा मतदारसंघात पवार गटाच्या सभा होत आहेत. मात्र, कर्जत-जामखेडमध्ये या दौऱ्यात त्यांची सभा नाही.गुरूवारी २६ सप्टेंबरला अकोले तालुक्यातून जयंत पाटील यांच्या दौऱ्याची सुरवात होणार आहे. सकाळी अकोले तालुक्यात कोतूळ, दुपारी शेवगाव आणि सायंकाळी श्रीगोंद्यात त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्या दिवशी रात्री नगर शहरात त्यांचा मुक्काम आहे. शुक्रवारी सकाळी नगर शहर, दुपारी शिर्डीत साईबाबांचे दर्शन, त्यानंतर राहुरी आणि सायंकाळी पारनेरमध्ये त्यांची सभा होणार आहे.
What's Your Reaction?








