चतुर श्रेणी मिळण्यासाठी कोतवाल देणार लढा. मागण्या मान्य न झाल्यास २६सप्टेंबर पासून मुंबईत आझाद मैदानावर करणार आंदोलन...

Sep 24, 2024 - 10:43
 0  56
चतुर श्रेणी मिळण्यासाठी कोतवाल देणार लढा. मागण्या मान्य न झाल्यास २६सप्टेंबर पासून मुंबईत आझाद मैदानावर करणार आंदोलन...

उमरी/कैलास सोनकांबळे

   :१ कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा मिळावा २:कोतवाल पदनाम बदलून महसूल सेवक नामकरण व्हावे ३ :अनुकंपा बाबत विचार विनिमय व्हावा ४: कोतवाल मधून महसूल सहाय्यक तलाठी पदोन्नती बाबत इतर मागण्या साठी मागण्या मान्य न झाल्यास २५ सप्टेंबर पासून मुंबई आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करणार.

राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पुर्वतयारी कोतवालांनी आक्रमक भूमिका घेतली असून दिनांक २४ सप्टेंबर रोजी मंगळवारी राज्यभर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन योजना २५ सप्टेंबर पासून राज्यभर काम बंद आंदोलन तसेच २६सप्टेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असल्याची माहिती उमरी कोतवाल संघटनेचे अध्यक्ष दिलीप यम्मेवार यांनी दै.जागर मराठी बोलताना दिली महसूल प्रशासनातील कोतवाल हा महत्त्वाचा घटक आहे महसूल गोळा करणे निवडणूक प्रक्रियेत व स्थानिक पातळीवरील नित्यनियमाची कामे पारपाण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत असून कोतवालांना अद्याप पर्यंत चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळाला नाही.त्यामुळे त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आणि विधा मिळत नसल्याने आंदोलन करण्यात येणार आहे .उमरी कोतवाल संघटनेच्या वतीने पाठिंबा दर्शनाचे निवेदन उमरी तहसीलचे नायब तहसीलदार संजय सोलंकर यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर यम्मेवार डी.के.,राजेश राठोड ,शेख मोईस ,गोडवे डी.एम, कमले मल्लु ,बारटक्के तोटेवाड, साईनाथ ढगे, सतिश हनवते, धम्मादिना देवके, दर्शना वडजे, करुणा कदम, माधवराव हनवते, उत्तम सुरेश चंचलवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow