घरकुलाचे थकलेले हप्ते तात्काळ लाभार्थ्याच्या खात्यावर टाका : पवन जाधव पाटील !!
दैनिक जागर मराठी
हिंगोली : तालुक्यातील पंतप्रधान घरकुल,माता रमाई घरकुल आणि शबरी घरकुल योजना गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पूर्णपणे ठप्प झाले असून, शासनाच्या महत्त्वकांशी योजनांची थकीत हप्ते देण्याची मागणी लासिना येथील पवन जाधव पाटील यांनी केली आहे. हिंगोली तालुक्यासह लासिना येथील सर्व घरकुलाच्या योजनेची हस्ते मंजूर होऊनही बँक खात्यावर पडले नसल्याने घरकुलाचे काम रखडले आहे.त्यामुळे घरकुल लाभार्थी पंचायत समिती चकरा मारत आहेत. थकीत हप्त्या विषयी प्रशासनाकडून सरळ उत्तर मिळत नसल्याने लाभार्थ्यामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. निधी अभावी हप्ते थकल्याची तालुकास्तरावर माहिती सांगण्यात येत आहे.घरकुलाचा निधी प्रशासनाने जाणीवपूर्वक ठप्प केला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. घरकुल कामे अर्धवट पडली आहेत,तर अनेक लाभार्थी कर्जबाजारी होऊन हाताशी आलेले घर पुन्हा स्वप्नातच ढकलले जात असल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.अधिकाऱ्यांची टाळाटाळ होत असल्याने जनतेचा संताप उसळला आहे. तरी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून घरकुल निधी वितरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन जाधव पाटील यांनी केली आहे.
What's Your Reaction?








