कॅप्टन सुनील डोबाळेंच्या प्रचारासाठी महीला शक्ती मैदानात !!

Nov 15, 2024 - 04:53
Nov 15, 2024 - 05:04
 0  196
कॅप्टन सुनील डोबाळेंच्या प्रचारासाठी महीला शक्ती मैदानात !!
कॅप्टन सुनील डोबाळेंच्या प्रचारासाठी महीला शक्ती मैदानात !!
कॅप्टन सुनील डोबाळेंच्या प्रचारासाठी महीला शक्ती मैदानात !!
कॅप्टन सुनील डोबाळेंच्या प्रचारासाठी महीला शक्ती मैदानात !!
कॅप्टन सुनील डोबाळेंच्या प्रचारासाठी महीला शक्ती मैदानात !!

पत्नी सौ.वंदना डोबाळेंनीही सांभाळली प्रचाराची धुरा 

अकोट प्रतिनीधी 

अकोट - आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळत तसेच कॅप्टन सुनील डोबाळे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता महिला शक्ती ही त्यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरल्या आहेत. अकोट विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या अर्धांगिनी कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या प्रचाराकरता निवडणुकीच्या रिंगणात  उतरल्या आहेत. त्यांचे हात बळकट करण्याकरिता त्या अनेक गावात आपल्या प्रचाराची घोडदौड करीत आहेत. 
आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या उद्देशाने साथ देत असलेली पत्नी जेव्हा पतीच्या प्रचारासाठी पुढे सरसावत मैदानात उतरते तेव्हा त्या महिलेच्या असीम प्रेमाचा व शक्तीचा परिचय येतो असे बोलले जाते. सौ वंदना व ताजनापुर गावातील सर्व महिला देखील यांनी पदर खोचून स्वतःला निवडणुकीच्या प्रचारात झुकून दिले आहे. रेल्वे इंजिन च्या प्रचार करित सौ वंदना डोबाळे यांनी संपूर्ण अकोट तेल्हारा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मतदारसंघातील बऱ्याच महिला पदाधिकाऱ्यांनी ंच्या नियुक्त करून त्यांच्या सोबतीने आपली एक रणनीती आखून शिस्तबद्ध प्रचार सुरू केला आहे. सकाळ दुपार सायंकाळचे तीन टप्प्यात महिला शक्ती सोबत घेऊन वंदना डोबाळे ह्या डोअर टू डोअर प्रचार करीत आहेत. सौ .वंदना डोबाळे यांच्या नेतृत्वातील महिला शक्ती ह्या प्रत्येक नगरात व प्रत्येक गल्लीतील मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेत आहे या सर्व बाबी मार्गी लावण्यासाठी कॅप्टन सुनील डोबाळे यांना संधी देण्याचे आवाहन देखील त्या करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow