हरात ‘सत्तासमीकरणां’चा भूकंप!!
दैनिक जागर मराठी
अंजनगाव सुर्जी - शहरातील राजकीय वातावरण २ तारखेच्या निवडणूक प्रक्रिया स्थगिती नंतर पुन्हा एकदा अचानक तापू लागले आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे आता स्थानिक राजकारणात कर्णधार म्हणून वर्चस्व राखणाऱ्या काही नामांकित दिग्गजांना आगामी घडामोडींचा सौम्य पण ठोस धक्का बसण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. बदलत्या परस्थितीमुळे शहरात सत्तेची समीकरणे नव्याने लिहिली जात असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत.
अंतर्गत गटबाजी, बदलती जनभावना आणि नव्या नेतृत्वाचा उदय—या तीन घटकांनी सध्याची परिस्थिती पूर्णपणे उलटी-पुलटी केली आहे. अनेक वर्षांचा अनुभव, संघटनावरची पकड आणि मोठा समर्थकवर्ग असूनही काही दिग्गजांना आपल्या स्थानाबाबत नवी रणनीती आखण्याची वेळ आली आहे.नव्या नेतृत्वामुळे वाढली अस्वस्थता
मागील काही महिन्यांपासून शहरात काही तरुण आणि ऊर्जावान नेतृत्व पुढे येत आहे. या नव्या नेतृत्वाने केलेली तडफदार कामगिरी, सोशल मीडिया कॅम्पेन आणि जनतेत वाढत चाललेली लोकप्रियता लक्षात घेता पारंपरिक गटांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
राजकीय तज्ज्ञांचे मत स्पष्ट आहे— " शहरात निवडणुक रिंगणात उमेदवारांना मतदार नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात दिसतात.”गटांमध्ये अंतर्गत नाराजीचे संकेत
काही वरिष्ठ नेत्यांमधील नाराजी आता पृष्ठभागावर येऊ लागली आहे. अनेक ठिकाणी बैठकीतून गैरहजेरी, निर्णयप्रक्रियेत मतभेद आणि तोंडी उत्तेजना यामुळे गटांत ‘भेदरेषा’ स्पष्ट जाणवू लागल्या आहेत. काहीजण सध्याच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत असल्याची माहितीही समोर येत आहे.शहरातील नागरिकांचे लक्ष नव्या घडामोडीकडे स्थानिक नागरिकही या घडामोडीकडे उत्सुकतेने पाहात आहेत. प्रकल्पांची गती, निधीचे वाटप, शहरातील प्राधान्याच्या समस्या—या सगळ्यावर कोणते नेतृत्व पुढे येईल, याकडे त्यांचे लक्ष आहे.
नागरिकांचा सूर साधारण असा— “राजकारणात स्थिरतेसोबत बदलही हवा. काम करणाऱ्या नेतृत्वालाच पाठिंबा.”पुढील काही दिवस निर्णायक
राजकीय वातावरणात निर्माण झालेली ही नवी हलचल येत्या काही दिवसांत अजून निर्णायक वळण घेऊ शकते. शहरातील काही महत्त्वाच्या बैठका, संघटनात्मक हालचाली आणि पुढील विकासात्मक घोषणांनंतर अनेक दिग्गजांच्या भविष्याबाबतची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
What's Your Reaction?








