अकोट शहरातील विद्या कॉलनी मध्ये जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नाली चा पाईप फुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता !!

Dec 6, 2025 - 16:57
 0  11
अकोट शहरातील विद्या  कॉलनी मध्ये जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नाली चा पाईप फुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता !!
अकोट शहरातील विद्या  कॉलनी मध्ये जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नाली चा पाईप फुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता !!

दैनिक जागर मराठी 

अकोट :  शहरातील विद्या कॉलनीतील गजानन मंदिराच्या बाजूने, जिथे लेआउट पडले आहेत ज्या ठिकाणावरुन सरकारी गोदामाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्यभागी अर्धी ठिकाणी सिमेंटचे पाईप टाकण्यात आले आहे.या पाईपवरुन दररोज अनेक महिला आणि मुले दुचाकी चालवतात. आणि  या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या संदर्भात तेथील कर्मचाऱ्यांना आणि येथील नागरिकांना अनेक वेळा सांगण्यात आले की पाईपच्या बाजूने थोडी माती किंवा मुरूम टाकून ते समांतर करा जेणेकरून ह्या स्पीड ब्रेकरवर दररोज अपघात होऊ नयेत या साठी येथील नाली बांधकाम करणाऱ्या सुध्दा म्हटले असता तेव्हा त्यांनी सुध्दा अपशब्द वापरत उत्तर दिले.नाईलाजाने  शेवटी  स्वतः वकीलाने पावडे आणि टोपले घेतले आणि ज्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता होती तिथे माती टाकली आणि त्या ठिकाणी  समांतर उतार करत असताना तेथील कर्मचारी सदर वकीलाला पाहून हसत होते. सदर काम हे वकिलांचे नव्हते परंतु ही चूक वकिलांनी केली व त्या ठिकाणी कोणाचा अपघात होण्याचे आधी माती टाकण्यात आली मात्र हे काम नगर परिषद बांधकाम विभागाचे होते.जर या ठिकाणी एखाद्याचा जीव गेला असता तर  याला कोण जबाबदार असते नगर परिषद प्रशासन की मुख्याधिकारी की ठेकेदार या रस्त्याच्या फुटलेल्या अवस्थे कडे नगर परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow