अवैधरित्या मॅफेडॉन (एम.डी.) ची विक्री करणारा जेरबंद !!

Dec 16, 2025 - 16:03
 0  7
अवैधरित्या मॅफेडॉन (एम.डी.) ची विक्री करणारा जेरबंद !!

 दैनिक जागर मराठी

अमरावती :  १५ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हेशाखाचे पथक हे आयुक्तालय हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पेट्रोलींग करीत असताना बाबा उर्फ जमीर रा. गवळीपुरा अमरावती व त्याचे सोबत आसीम खान नावाचा एक मुलगा असे त्यापैकी बाबा उर्फ जमीर याने पांढरे शर्ट व काळे पॅन्ट असे कपडे घातले असुन आसीम खान याने पांढ-या कथीया रंगाचे टी शर्ट व काळया रंगाचे लोअर पॅन्ट घातली. हे दोन्ही इसम आपले जवळ अवैध्यरित्या मेथेंडॉन (एम.डी.) नावाचा अंमली पदार्थ बाळगुण विक्री करण्याचे इरादयाने त्याचे ताब्यातील कथीया रंगाची अॅक्टीवा गाडी क्र. एम.एच ३१ एफ एम. ३७४० ने लालखडी रिंग रोड येथे येणार आहे. अशा मिळालेल्या माहीतीवरून पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांचे नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद ठिकाणी सापळा रचुन मोठ्या शिताफीने दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. त्यांचे ताब्यातून ५२ ग्रॅम निव्वळ एम.डी. अंमली पदार्थ, एक मोबाईल किंमत अंदाजे १० हजार रुपये, एक कथीया रंगाची अॅक्टीवा गाडी क्र. एम.एच ३१ एफ एम. ३७४० किंमत अंदाजे ८० हजार रुपये असा एकूण सहा लाख १० हजार रुपयेचा मुददेमाल जप्त करून ताब्यात घेतला. ताब्यात घेतलेल्या आरोपींना सदर माला बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा अंमली पदार्थ माल हा १) शेख राजा शेख रहीम उर्फ होंगा रा. गवळी पुरा अमरावती २) शेख सोनू शेख रहीम उर्फ होंगा रा. गवळी पुरा अमरावती ३) शेख फईम शेख रहीम उर्फ हुंगा शेख आमद रा. गवळी पुरा अमरावती ४) शेख रहीम उर्फ हुंगा शेख आमद रा. गवळी पुरा अमरावती यांचे मालकीचा असल्याचे सांगीतले आहे. नमुद आरोपीतां विरुध्द पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. नमुद अटक आरोपींनी सदरची एम.डी. ही कोणाकडून खरेदी केली तसेच सदरची एम.डी ही अमरावती शहरातध्ये कोठून आली याबाबत सविस्तर तपास गुन्हे शाखा यांचे मार्फत सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल. तसेच अमरावती शहरात एम.डी. बाळगणारे त्याचे सेवन करणारे, विक्री करणारे यांचेबाबत गोपनिय माहीती काढण्यात आली असून त्यांच्यावरही नजीकच्या काळात धडक मोहीम राबविण्याबाबत पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी आदेशीत केले आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow