उद्धवजींचा इगो दुखावला आणि त्यांनी या मेट्रोला स्थगिती दिली होती – फडणवीस !!
मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाण्यात बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एमएमआर रिजनमध्ये काम हाती घेतले आहेत. आशियातील सर्वात मोठ्या लाईनचं उद्घाटन आज मोदीजी करत आहेत. नवरात्र सुरु आहे. मोदीजी फक्त ९ दिवस उपवास करतात. फक्त पाणी पितात. मेट्रो ३ ला महाविकासआघाडीने स्थगिती दिली होती. हजारो कोटी रुपये खर्च करुन स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, ही पर्यावरणाची साथ देणारी मेट्रो आहे. पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे. पण उद्धव ठाकरे यांचं इगो दुखावल्याने त्यांनी स्थगिती दिली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवीन सरकार येताच पहिल्या टप्प्याचं काम आम्ही पूर्ण केलं.‘मोदीजी तुमची आणि जपानची मैत्री यामुळे जपानच्या सरकारने मदत केली. म्हणून मेट्रो तयार होत आहे. रोज १७ लाख प्रवासी यातून प्रवास करतील. लोकांच्या जीवनात सुखाचे दिन येतील. ठाण्यात अंतर्गत रिंग मेट्रोचं ही उद्घाटन आज होत आहे. यामुळे लोकांचं जीवन सुखर होणार आहे. ठाणे आणि मुंबईत आता फक्त २० मिनिटांचं अंतर असणार आहे. मुंबई पेक्षा तीन पट मोठी मुंबई होणार आहे. त्याची ही सुरुवात इथे होत आहे.’
What's Your Reaction?








