अमृतच्या जिल्हा कार्यालयाचे आज उद्घाटन !!

Dec 10, 2025 - 12:31
 0  6

दैनिक जागर मराठी 


अमरावती : खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. सदर कार्यालय अमृत कार्यालय, आशीर्वाद बिल्डिंग, मालटकेडी समोर, बस स्टँड रोड, टोपे नगर, अमरावती येथे स्थित आहे. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. विशेष कार्यकारी तथा प्रबंधक संचालक सिद्धेश्वर वरणगावकर, राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडीलकर, अमरावती विभाग व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार उपस्थित उपस्थित राहतील.जिल्हा कार्यालयामुळे संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ नागरिकांना अधिक सुलभपणे मिळणार असून रोजगार निर्मितीला नवी दिशा मिळणार आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही संस्था राज्यात कौशल्य विकास, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि रोजगारसंधी निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. युवकांनी औद्योगिकदृष्ट्या शैक्षणिक आणि व्यवसायिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी अमृत उपक्रम राबवित आहे. जिल्हा कार्यालय सुरू झाल्यानंतर स्थानिक पातळीवर अधिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. विविध उपक्रमांची अंमलबजावणी जलद गतीने होईल. या कार्यालयामुळे प्रशिक्षण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योग उभारणी यासारख्या अनेक संधी उपलब्ध होतील.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow