अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात !!
जिल्हा प्रतिनिधी
अमरावती - विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. अमरावतीची "अंबा"देवीला विदर्भाचे कुलदैवत म्हणून संबोधल्या जाते.
विदर्भातील प्राचीन शहर असलेल्या अमरावती शहराची पौराणिक दृष्ट्या ओळख आहे.
कौंडण्यपूर येथील विदर्भ राज्य करणाऱ्या भीष्मक राजाने आपली सुकन्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवला होता,तो तिला अमान्य होता, तिने श्रीकृष्णाला आपली इच्छा कळवताच श्रीकृष्णाने कौंडण्यपूर येथे येऊन माता रुक्मिणीचे हरण केले व याच अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आणून अंबादेवी मंदिरात भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीशी विवाह केल्याची आख्यायिका आहे. श्रीकृष्ण काळापासून हे मंदिर अस्तित्वात असून आजही अमरावती शहरातील अंबा मातेच स्थान जागृत समजले जाते.
अंबादेवीचे मूर्तीस मंगळवार, पौर्णीमा, अमावस्या, नवरात्र व महत्वाचे सणाचे दिवशी मुखवटा व संपूर्ण सुवर्णालंकार, जडजवाहीर चढविल्या जातात. इ.स.1995 साली मंदिराचे सभागृहाचा जिर्णोद्धार करण्यात आला.
अमरावतीतील याच अंबादेवीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लग्नाची पत्रिका आली होती,असे सांगितले जाते. याच अंबादेवी संस्थान मध्ये आता नऊ दिवस नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून हजारो भाविक अंबादेवीच्या दर्शनासाठी रांगा लावतात.अंबादेवी संस्थांचा संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला असून नऊ दिवस या परिसरामध्ये यात्रेचे आले आहे.
What's Your Reaction?








