अखेर निंभोरा येथील ग्रामस्थांनी रस्त्याचे काम सुरू केले !!
रखडलेल्या रस्त्यावर स्वयंस्फूर्तीने टाकला मुरूम.
अकोला तालुका प्रतिनिधि,
राहुल खाडे,
निंभोरा गट ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक एक व तीन मधील रस्ता बऱ्याच वर्षापासून रखडलेला आहे त्यामुळे ग्रामस्थांचे पावसाळ्यात घाल होत असून या रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे. शासनाकडे पाठपुरावा करून थकलेल्या ग्रामस्थांनी अखेर स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला आहे या रस्त्यावर स्वखर्चाने मुरूम टाकून रस्त्याचे काम सुरू केले. निंभोरा येथील रस्ता मागील पंचवार्षिक मध्ये मंजूर झाला.असे सांगण्यात येत आहे त्या रस्त्यावर नारळ सुद्धा फोडले.मात्र पुन्हा पावसाळा आला तरीही रस्त्याचे काम काही झाले नाही आणि होण्याची शक्यता दिसत नसल्याने ग्रामस्थांनी स्ववय पुरती ने रोडवर मुरूम टाकून तो फैलून रस्ता करणे चालू केले ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेविका यांना भेटून विनंती केली की आम्ही टॅक्स भरण्यास तयार आहोत परंतु रस्ता ची सांडपाणी ची विलेव्हाट लावावी अन्यथा आम्ही टॅक्स जमा करून रस्त्यावर मुरूम टाकून व सांडपाणी वाहून जाण्यऱ्या नाल्यांची सफाई करू अशी गावकऱ्यांनी भुमिका घेतली आहे.ग्रामस्थांनी स्ववय पुरती ने रोडवर मुरूम टाकून रस्ता बनवण्याचे काम चालू केले आहे.त्यामुळे ही समस्या स्वतःच सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामस्थांनी स्वयं स्फूर्तीने रस्त्यावर मुरूम टाकला व तो पसरविण्याचे काम सुरू आहे.
प्रतिक्रिया:-
ग्रामपंचायत प्रशासनाने रोड तयार करण्यासाठी ठराव घेतलेल्या आहे परंतु वार्ड न ऐक मधील रोडवर पाणी साचत असल्याने ग्रामस्थांनी रोडवर सध्या स्वव खर्चा ने मुरुम टाकणे चालू केला आहे त्यांच्या कडून टॅक्स वसूल करुन बिल देण्यात येईल.
गोवर्धन ओहे - ग्रा प सदस्य
निभोरा येथील वार्ड न 1मधील रस्ता बनविण्यासाठी बरेच वेळा नारळ फोडुन उद्घाटन झाले परंतु रस्ता झाला नाही ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेविका यांना भेटून टॅक्स भरण्यास तयार आहोत तरी पण त्यांच्या कडे वेळच नसल्याने सांडपाणी वाहून जाणारी नाली सुध्दा काढत नाहीत तर रस्ता दुरच राहीला.
गजानन उगवेकर- ग्रामस्थ,निभोरा
वार्ड न ऐक मधील रोड हा काहीक वर्ष पासून झाले ला नाही रोडवर पाण्यामुळे घरी जाऊ सुध्दा शकत नसल्याने आम्ही स्व खर्चाने रोडवर मुरूम टाकून रस्ता बनवण्याचे काम हाती घेतले आहे हा रोड बनविण्यासाठी मागील वर्षी नारळ सुध्दा फोडले होते परंतु अद्याप रस्ता न झाल्याने आम्ही हा निर्णय घेतल्या आहे.
केशव गोडचोर, ग्रामस्थ निंभोरा
निभोरा गट ग्रामपंचायत येथील वार्ड न 1 मधील मेन रोड काहीक वर्ष पासून बनविण्यात आला नाही हा रोडवर बरेच वेळा नारळ फोडुन उद्घाटन झाले परंतु रस्ता झाला नाही हा रोडवर पावसाळ्यात साधे चालने कठीण आहे वाहन जातच नाही त्यामुळे आम्ही स्वयम् खर्चाने मुरुम टाकुण रस्ता तयार करीत आहोत.
श्रीकृष्ण ताठे- ग्रामस्थ,निभोरा
What's Your Reaction?








