पालांदूर ठाणेदाराचे आशीर्वादाने अवैध धंद्यांचा ग्राफ वाढला !!
दैनिक जागर मराठी
नरेंद्र मेश्राम
लाखनी :- चुलबंद नदीखोऱ्यात वसलेल्या पालांदूर परिसरात येथील ठाणेदारचे दुर्लक्षामुळे अवैध रेती उत्खनन व वाहतूक, अवैध दारू विक्री खुलेआम सुरू असल्यामुळे गावाचे आरोग्य बिघडण्याचे मार्गावर असून रात्रीच्या सुमारास मद्यपीच्या भीतीने आवश्यक कामासाठी महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तर शाळकरी विद्यार्थी व्यसनाधिन होण्याचे मार्गावर असल्यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री बेरात्री अवैध रेती वाहतुकीमुळे अपघाताची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालून अवैध धंदे बंद करावे. अशी मागणी होत आहे. पालांदूर पोलिस ठाण्याचे कामकाज सुचारू पद्धतीने चालावे. या करिता ४ बीटात ५२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. ४८ गावे लोकवस्तीची तर ४ गावे रीठी आहेत. पालांदूर पोलिस ठाण्याचे हद्दीत भूगाव, पळसगाव, विहीरगाव, नरव्हा, पाथरी, मरेगाव, वाकल हे रेती घाट असून ठाणेदराचे आशीर्वादाने रेती तस्करांकडून रात्री-बेरात्री अवैध रेती उपसा व वाहतूक बिनबोभाट सुरू आहे. पोलिसांशी रेती तस्करांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे कारवाई केली जात नाही. पण ठरलेल्या वेळी एखाद्या रेती तस्कराने अर्थकारण केले नाही तर नेमकी त्याचं तस्कराची ट्रॅक्टर ट्रॉली पकडण्यात येते. यावरून ट्रॅक्टर लोकेशनची पूर्ण कल्पना पोलिसांना असते म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जेवनाळा, हमेशा/मुरमाडी, इसापूर, मुरमाडी/तूप., किटाडी, पालांदूर यासह अनेक गावांत अवैध दारू विक्री केली जाते. ठराविक दिवशी संबंधित बीट हवालदार येऊन ठरलेली रक्कम घेऊन जातो. त्यानंतर गावात या पोलिस हवालदाराचा पत्ताच लागत नाही. एखाद्या गावकऱ्यांने अवैध व्यवसायिकाविषयी पोलिसांकडे तक्रार केल्यास ज्याची तक्रार आहे. त्या अवैध व्यवसायिकास माहिती दिली जाते. त्यामुळे अवैध दारू विक्रीची तक्रार करण्यास कोणी धजावत नाही. सायंकाळपासून अवैध दारू विक्रेत्याचे घरासमोर मद्यपीची जत्रा भरत असल्याने रात्रीच्या सुमारास आवश्यक कामासाठी महिलांना घराबाहेर पडणे कठीण होते. तर विद्यार्थ्यांसह युवक व्यसनधिनतेच्या प्रमाणात वाढ झाल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या शिवाय चोरून लुकून मोबाईलवर सुट्ट्याची आकडेमोड केली जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. हा प्रकाराने गावाचे आरोग्य बिघडण्याची मार्गावर आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेली अवैध रेती उपसा व वाहतूक तसेच अवैध दारू विक्री व सट्टा बंद करण्यात यावा. अशी मागणी होत आहे
What's Your Reaction?








