सांगळूदकर महाविद्यालयामध्ये स्व. निलय भांबुरकर व्याख्यानमाला संपन्न
गौरव टोळे
दर्यापूर (प्रतिनिधी) :
येथील जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात रसायनशास्त्र व आक्यूएसी विभागातर्फे स्व. निलय भांबुरकर यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे तसेच उद्घाटक म्हणून ॲड. भाऊसाहेब व्हि.जी.भांबुरकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य विनायक भांबुरकर, माजी सचिव, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती उपस्थित होते. तसेच विषयतज्ञ
म्हणून प्रा. डॉ. योगिता ठाकरे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अकोला, प्रा. डॉ. संजय कोल्हे, श्री शिवाजी विज्ञान आर्ट्स कॉमर्स महाविद्यालय अकोट, प्रा. वैभव श्रीखंडे, डॉ. आर.डी. राठोड आर्ट्स सायन्स कॉलेज मूर्तिजापूर हे उपस्थित होते.
ॲड.भांबुरकर यांच्या आर्थिक साहाय्याने या व्याख्यानामालेचे दरवर्षी बी.एस्सी. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात येत असते.
व्याख्यानमालेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी स्व. निलय भांबुरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच प्राचार्य विनायकराव भांबुरकर व ॲड. भांबुरकर यंन याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
व्याख्यानमालेचे संचालन प्रा. शुभांगी सोनवणे यांनी तर प्रास्ताविक डॉ. पुष्पा दहीकर (रसायनशास्त्र विभाग प्रमुख)यांनी केले. आभार डॉ. देवल देशमुख यांनी मानले. या व्याख्यानमालेसाठी विज्ञान शाखाप्रमुख डॉ. विजय येलकर, आयक्यूएसी समन्वयक प्रा. मनीष होले, डॉ. अनिल सोमवंशी, डॉ. अपर्णा दिघडे, वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शाखेचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विज्ञान शाखेतील तीनही वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.
What's Your Reaction?








