संजूच्या शिरपेचात मानात तुरा, पहिल्याच मॅचमध्ये विजय मिळवत मोडला शेन वॉर्नचा विक्रम !!
मुंबई : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघाने पंजाब किंग्सवर दमदार विजय मिळवला. संजू आणि यशस्वी जयस्वाल यांनी धडेकाबाज सलामी दिली. त्यामुळेच राजस्थानच्या संघाला २०५ धावांचा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला पंजाबने सुरुवातीलाच धक्के दिले होते. त्यामुळे त्यांना या सामन्यात वर्चस्व राखता आले. राजस्थानचा हा या हंगामातील दुसरा विजय ठरला, तर पंजाबच्या संघाचा हा पहिलाच पराभव ठरला आहे. राजस्थानने या सामन्यात पंजाब किंग्सवर ५० धावांनी विजय साकारला. या सामन्यातील विजयासह संजू सॅमसन याने मोठा विक्रम आपल्या नावालर केला आहे.
संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखाली राजस्थानचा ३२ वा विजय ठरला आहेच. राजस्थानसाठी आपल्या नेतृत्त्वात सॅमसमने सर्वाधिक ३२ विजय मिळवून दिले आहेत. याआधी हा विक्रन शेन वॉर्नच्या नावावर होता. शेन वॉर्नने राजस्थानसाठी ३१ सामने जिंकले होते. वॉर्नने ५५ सामन्यांमध्ये ३१ विजय मिळवले होते. तर राहुल द्रविड हा तिसरा यशस्वी कर्णधार असून त्याने १८ विजय मिळवले आहेत. संजूने पहिल्याच सामन्यात आपल्या नेतृत्त्वात विजय मिळवत चांगली सुरूवात करून दिली आहे.
जस्थानच्या २०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाला सुरुवातीलाच धक्के बसले. त्यामुळे त्यांची अवस्था ४ बाद ४३ अशी झाली होती. पण त्यानंतर नेहार वधेरा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी दणदणीत फटकेबाजी करत संघाचे आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण दोन चेंडूंमध्ये हे दोघेही बाद झाले आणि पंजाबच्या हातून सामना निसटला. वधेराने यावेळी ४१ चेंडूंत ४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६२ धावा केल्या, तर मॅक्सवेलने २१ चेंडूंत ३० धावा केल्या
What's Your Reaction?








