“शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करु नये, पराभव स्वीकारावा आणि..”, भाजपाच्या ‘या’ नेत्याची टीका !!
शरद पवार यांनी मतांची संख्या सांगत आम्हाला मतं जास्त मिळाली तरी जागा कशा काय कमी आल्या हा प्रश्न उपस्थित केला आहे. शरद पवारांनी त्यासाठी एक गणितच मांडलं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक निकालाचं गणित मांडूनच शरद पवारांना उत्तर दिलं. आता आज भाजपाचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी शरद पवारांनी अपयश झाकण्यासाठी असा खोटारडेपणा करु नये असं म्हटलं आहे.
शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडली आणि त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली आहेत, तर त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही जवळपास ४१ आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते ७२ लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त १० आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ५८ लाख एवढे मतदान मिळाले, पण त्यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत.”
What's Your Reaction?








