विहिरीत पडलेल्या बिबटयाला वनविभागा कडून जीवदान !!

Aug 25, 2024 - 18:03
 0  19
विहिरीत पडलेल्या बिबटयाला वनविभागा कडून जीवदान !!

जिल्हा प्रतिनिधी / सुंनिल घुमरे ,

नाशिक 

          Bनिफाड तालुक्यातील शिरसगाव येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला चांदवड वनपरीक्षेत्र, येवला वनपरीक्षेत्र अधिकारी व कर्मचारी तसेच आधुनिक बचाव पथक निफाड व ए.आर. ई ए. एस. फाउंडेशन व स्थानिक रहिवासी यांच्या संयुक्ततेने सुरक्षित रित्या बाहेर काढून जीवदान दिले आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की शिरसगाव ता निफाड येथील संदीप भाऊराव सोनवणे यांच्या गट नंबर ३४९ मधील शेतातील विहिरीत अंदाजे चार वर्ष वयाचा बिबट्या पडला असल्याचे स्थानिक शेतकऱ्यानी बघितले. त्यांनी लागलीच वनविभाग यांच्याशी संपर्क साधून घटना स्थळी बोलावले.

सहाय्यक वनसंरक्षक चांदवड शिवाजी सहाणे,वनपरीक्षेत्र अधिकारी येवला अक्षय म्हेत्रे,चांदवड वनपरीक्षेत्र अधिकारी एस बी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वडनेर भैरव अजय शिंदे, वनरक्षक व्ही आर टेकणर,वनरक्षक सुनील खंदारे,वनसेवक भरत वाघ, वनसेवक वसंत देवरे,वाहन चालक अशोक शिंदे,आधुनिक बचाव पथकाचे विजय माळी, सागर दुसिंग,ज्ञानेश्वर निहारे,गोकुळ माळी,ए.आर. ई ए.एस.फाउंडेशन चे वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर,सर्परक्षक देविदास सताळे, राजेश शेजवळ, कसबे सुकेने येथील सामाजिक कार्यकर्ते शरद जाधव यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने क्रेन च्या साहाय्याने पिंजरा विहिरीत सोडला बिबटया विहिरीतील लोखंडी अँगलचा आधार घेतला त्यामुळे त्याला सुरक्षित वाटत होते.पिंजरा बिबट्याच्या तोंडासमोर नेला असता बिबट्याने स्वतः हुन पिंजऱ्यात प्रवेश केला. लागलीच पिंजऱ्याचा दरवाजा बंद करुन बिबट्याला सुरक्षित रित्या विहिरीच्या बाहेर काढण्या यश आले. बिबट्याला लवकरच त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार असल्याची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली.पिंपळगाव येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी योग्य ते नियोजन करून बघ्याची गर्दी वर नियंत्रण ठेवले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow