राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा संपन्न!!

Dec 21, 2025 - 16:40
 0  7
राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा संपन्न!!

दैनिक जागर मराठी 
अमरावती : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय शालेय आर्चरी (धनुर्विद्या) क्रीडा स्पर्धा २०२५-२६ उत्साहात पार पडली. जिल्हा क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंजवर १७ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी रिकर्व्ह राऊंडमध्ये खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले. यातून निवडण्यात आलेला महाराष्ट्राचा चमू आता आगामी ६९व्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करेल  सायंकाळच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमकुम मोहोड हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच स्पर्धेचे तांत्रिक कामकाज पाहणाऱ्या ३० पंचांचाही गौरव करण्यात आला. उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार, वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी स्वाती बाळापुरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक अमर जाधव, निवड समिती सदस्य शुभांगी रोकडे, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर, प्रशिक्षक प्रविण शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, क्रीडा अधिकारी अनिल इंगळे आदी या सोहळ्याला उपस्थित होते. निवड झालेला १७ वर्षांखालील संघ ६ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान झारखंड येथे, तर १९ वर्षांखालील संघ १४ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईल. राष्ट्रीय स्तरासाठी निवडलेला संघ (रिकर्व्ह राऊंड) १७ वर्षांखालील मुलेमध्ये आदित्य पवार (पुणे विभाग) ६८६ गुण, ज्ञानेश चेरले (लातूर विभाग) ६७७ गुण, आर्यन राठोड (क्रीडा प्रबोधिनी) ६७२ गुण, सिद्धार्थ तिकोणे (पुणे विभाग)  ६६२ गुण तसेच १७ वर्षांखालील मुलीमध्ये कुमकुम मोहोड (अमरावती विभाग) ६५७ गुण, मधुरा राठोड (अमरावती विभाग) ६३९ गुण, प्रगती शिंदे (पुणे विभाग) ६३६ गुण, संचिता बाबर (कोल्हापूर विभाग) ६३४ गुण आणि १९ वर्षांखालील मुलेमध्ये कृष्णा शिंदे (पुणे विभाग) ६५५ गुण, साईराज हनमे (पुणे विभाग) ६५४ गुण, अभिराज मानमोडे (अमरावती विभाग) ६५० गुण, अभ्युदय पखाले (क्रीडा प्रबोधिनी) ६४९ गुण तसेच १९ वर्षांखालील मुलीमध्ये वैष्णवी पवार (पुणे विभाग) ६५५ गुण, तनुश्री श्रीनाथ (अमरावती विभाग) ६१० गुण, गार्गी चव्हाण (पुणे विभाग) ५८२ गुण, समीक्षा देशमुख (पुणे विभाग) ५७९ गुण.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow