महत्त्वाची सूचना खा. रवींद्र चव्हाण याच्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द !!
दैनिक जागर मराठी
नांदेड : यावर्षी मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी संकटाच्या गर्तेत सापडले असून पिकांचे, जनावरांचे तसेच शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी कुटुंबावर ओढावलेल्या या कठीण परिस्थितीची जाणीव ठेवून नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण साहेब यांच्या मंगळवारी (दि. ९ डिसेंबर) वाढदिवसानिमित्त सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त सर्व कार्यक्रम रद्द निर्णय घेतला आहे.शेतकऱ्यांच्या वेदना आणि त्यांच्या संकटांना प्राधान्य देत मित्रमंडळाच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येते की, "या कठीण काळात आपण सगळ्यांनी एकजुटीने शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहूया."
What's Your Reaction?








