बेंबळा शिवारखेड असदपूर रस्त्याचे डांबरीकरनाचे काम निकृष्ट दर्जाचे, तिन ते चार दिवसात रोड उखडायला लागला !!
दैनिक जागर मराठी
दर्यापूर:बेंबळा बु शिवारखेड, असदपूर,दरम्यान मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार झालेल्या या रस्त्याची कामे पूर्णता बोगस व निकृष्ट दर्जाची केली जात आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे बेंबळा, शिवारखेड ते असतपुर या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे अंतर ४,६००किलोमीटरसाठी २कोटी ९७ लक्ष ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या रोडचे करण्यात आलेले डांबरीकरणाचे काम अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून तिनच दिवसात डांबरीकरण केलेला रोड उखडायला लागला आहे. डांबरीकरणाच्या या कामात संबंधित ठेकेदाराने इंजिनियर यांनी काम पूर्णता निकृष्ट दर्जाचे करुन मोठया प्रमाणात गैरव्यवहार केला आहे.अमरावती जिल्ह्याचे तत्कालीन खासदार नवनित राणा यांनी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा रोड त्यांच्या निधीतून मंजूर करुन केला होता.रोड मंजूर झाल्यावर खडीकरण केले होते.खडीकरणाच्या कामातही संबंधित ठेकेदाराने मोठया प्रमाणात गैरव्यवहार केला होता.तिन दिवसाआधी खडीकरण केलेल्या रोडवर फक्त पाच ते सहा इंच एवढेच डांबरीकरण करण्यात आले. मात्र रोडचे डांबरीकरण हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून तिन दिवसातच डांबरीकरणाचा रोड उखडायला लागला आहे.बेंबळा, शिवारखेडा व असदपूर या गावांना जोडणारा हा रोड असून या रोडने तीनही गावातील शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात शेती असून शेतीच्या व दैनंदिन कामासाठी या रोडने नागरिकांची रहदारी राहत असून जर तीनच दिवसात हा रोड उखडत असेल तर पावसाळ्याचे काय? या निकृष्ट व बोगस कामात संबंधित ठेकेदार बांधकाम विभागाचे अधिकारी यांची मिलिभगत असल्याचे बोलल्या जात आहे शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून तयार झालेल्या रस्त्यांची ही अवस्थ पाहता, बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर आणि कामाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संबंधित गावाच्या ग्रामस्थांकडून होत आहे.
What's Your Reaction?








