पवनी नगर परिषद निवडणूक मतदान पार; निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार!!

Dec 10, 2025 - 13:38
 0  8

 दैनिक जागर मराठी 

पवनी : पवनी नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली असून ईव्हीएम मशीनमध्ये नोंदवलेले मतदान २१ डिसेंबर रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार उघडण्यात येणार आहे. निकालाबाबत सर्वच उमेदवारांमध्ये चढाओढ असून “मीच विजयी होणार” असा आत्मविश्वास व्यक्त करत विविध राजकीय गणिते मांडली जात आहेत.मतदानाच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांकडून काही उमेदवारांनी मतदारांपर्यंत घराघरात जाऊन प्रलोभने दिल्याच्या तक्रारी व्यक्त झाल्या. मतदारांनी अनेक उमेदवारांचा संपर्क वाढल्याचे सांगितले असून या घटनांवर काही नागरिकांनी नाराजी प्रकट केली. “महाराष्ट्राचा बिहार झाला” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर आणि नागरिकांमध्ये ऐकायला मिळाल्या. प्रशासनाकडून मात्र या सर्व तक्रारींची अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.मतदान संपल्यानंतर जवाहर गेट परिसरात विरोधकांमध्ये किरकोळ वाद झाल्याचे समजते. घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांच्या तात्परतेमुळे मोठे अनर्थ टळल्याचे स्थानिकांनी सांगितले.आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरकडे लागले आहे. पवनी नगर परिषदेची सत्ता कोणाच्या हातात जाणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow