कल्याण च्या सराईत गुन्हेगाराला चेन्नईत कंठस्नान, १० किलो सोने पोलिसांनी ताब्यात घेतले !!

Mar 27, 2025 - 09:52
 0  35
कल्याण च्या सराईत गुन्हेगाराला चेन्नईत कंठस्नान, १० किलो सोने पोलिसांनी ताब्यात घेतले !!

 कल्याण : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या इराणी(Irani) काबील्यात बुधवारी सकाळपासून अचानक सन्नाटा पसरला आहे. या काबिल्यातील जाफर गुलाम इराणी (२७) हा आंतरराज्यीय पोलिस रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार चेन्नईमध्ये(Chennai) पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याचे वृत्त येऊन आदळताच इराणी काबिल्यात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी चक्क विमान प्रवास करणारा हा बदमाश चेन्नई पोलिसांच्या गोळीचा शिकार झाला. त्याच्याकडे थोडे ना थोडके १० किलो सोने(Gold)सापडल्याचे वृत्त आहे.

आंबिवली स्टेशनजवळच्या पाटील नगर नावाने ओळखला जाणारा इराणी काबिला चोर, लुटारू, दरोडेखोर गुन्हेगारांमुळे पुरता बदनाम झाला आहे. याच काबिल्यात चोरी-छुपे राहणाऱ्या जाफर इराण्याचा अंत चेन्नई पोलिसांच्या हातून झाला आहे. जाफरच्या मृत्यूमुळे काबिल्याशी संबंधित अन्य बदमाश भूमिगत झाले आहेत. विमानाने परराज्यात जाऊन दरोडे, चोऱ्या, घरफोड्या, धूम स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा सरदार तथा म्होरक्या जाफर इराणी असल्याची माहिती चेन्नई पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी चेन्नईमध्ये पोलिसांनी आत्मरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात एकाचा मुडदा पडला. चेन्नईमधून तब्बल दहा किलो सोन्याची चोरी करून पसार होण्याच्या तयारीत असतानाच तेथील पोलिसांच्या गोळीने जाफर गुलाम इराणी(Jafar Ghulam Irani) याचा वेध घेतला. ज्यात हा बदमाश जागीच ठार झाला. तर सलमान मेश्राम आणि अमजद इराणी हे दोघे जखमी झाले.

चेन्नईत चेन स्नॅचिंगचे एकाच दिवसात ८ गुन्हे

हैदराबादला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच चेन्नई विमानतळावर(Chennai Airport) काही संशयितांना पकडण्यात आले. चेन्नईमध्ये मंगळवारी सोन्याच्या चेन स्नॅचिंगच्या अनेक घटना घडल्या, ज्यामध्ये एकट्या अड्यार पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६ गुन्हे दाखल झाले. संपूर्ण शहरात आठ घटनांची नोंद झाली. ज्यामध्ये मुखवटा परिधान केलेल्या दोघांनी दुचाकीवरून सकाळी ६ ते ७ दरम्यान वृद्ध आणि एकट्या महिलांना लक्ष्य केले. या गुन्ह्यात पोलिसांनी दोघांना अटक केली. थिरुवनमीयुर, बसंत नगर, सैदापेट, गिंडी, वेलाचेरी, तांबरम आणि पल्लीकरनई येथे या घटनांची नोंद करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow