Ravichandran Ashwin: अश्विनने वर्ल्ड रेकॉर्डसह रचला इतिहास, आतापर्यंत जगभारात कोणालाही ही गोष्ट करताच आली नाही...

Sep 22, 2024 - 10:32
Sep 22, 2024 - 10:36
 0  17
Ravichandran Ashwin: अश्विनने वर्ल्ड रेकॉर्डसह रचला इतिहास, आतापर्यंत जगभारात कोणालाही ही गोष्ट करताच आली नाही...

चेन्नई : बांगलादेशविरुद्ध मालिकेतील पहिल्या कसोटीत अडचणीत असलेल्या भारतीय संघासाठी रविचंद्रन अश्विन तारणहार ठरला. त्याने शतक झळकावले. यासह अश्विनने दिग्गज खेळाडूंना मागे टाकले. त्याचबरोबर अश्विनने यावेळी सामनावीर ठरला. अश्विनने यावेळी ऐतिहासिक कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला.चेन्नईच्या रविचंद्रन अश्विनने दिल्लीला नोव्हेंबर २०११मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याद्वारे कसोटी पदार्पण केले. कसोटी क्रिकेटमध्ये तीन हजारहून अधिक धावा आणि पाचशेहून अधिक विकेट घेणारा अश्विन भारताचा एकमेव क्रिकेटपटू आहे. वेळोवेळी अश्विन भारतीय संघासाठी तारणहार ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीतही अश्विनने भारताला अडचणीत बाहेर काढले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow