Railway Ticket | अर्ध्यावर आल्या तिकीटाच्या किंमती! भारतीय रेल्वेचा या प्रवाशांना मोठा दिलासा

Feb 28, 2024 - 17:37
 0  27
Railway Ticket | अर्ध्यावर आल्या तिकीटाच्या किंमती! भारतीय रेल्वेचा या प्रवाशांना मोठा दिलासा

नवी दिल्ली  : भारतीय रेल्वेने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. रेल्वे तिकीटाच्या किंमती अर्ध्यावर आणल्या आहेत. या मोठ्या कपातीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावरील भार कमी झाला आहे. कोरोना काळात भारतीय रेल्वेने सर्व प्रकारच्यी तिकीटाचे दर वाढवले होते. तर रेल्वेच्या अनेक योजनांना, तिकीट सवलतींना पण कात्री लावली होती. आता तिकीट दर कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. पॅसेंजर ट्रेनसाठी (Passenger Trains Ticket) हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पॅसेंजरच्या तिकीट दरात 40 ते 50 टक्के घसरण झाली आहे. मध्य रेल्वेचा (Central Railway) हा निर्णय पॅसेंजर ट्रेनला लागू असेल. कोरोना काळात तिकीटाचे दर दुप्पट झाले होते.

एक्सप्रेस ट्रेन इतके भाडे

पॅसेंजर ट्रेनचा किराया कमी करण्याची मागणी फार जूनी होती. पॅसेंजर असोसिएशन्सने या वाढलेल्या किरायाविरोधात आवाज उठवला होता. प्रवाशांच्या खिशावर या भाडेवाढीचा ताण येत होता. त्यासाठी अधिक पैसा मोजावा लागत होता. पॅसेंजर ट्रेनसाठी एक्सप्रेस ट्रेनच्या सारखा किराया द्यावा लागत होता. त्यामुळे रोज पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर ताण येत होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow