IPL चाहत्यांचं पहिलं प्रेम! काव्या मारन आधी ही होती आयपीएलची OG क्रश; हैदराबादशी होतं कनेक्शन !!
हैदराबाद : सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाला यावर्षी अद्याप साजेशी कामगिरी करता आलेली नाही. हैदराबादचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत दहाव्या स्थानावर असून रविवारच्या डबल हेडरमध्ये गुजरात टायटन्सशी घरच्या मैदानावर भिडणार आहे. आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीपासून हैदराबादचा संघ IPL चा भाग राहिला आहे.सुरुवातीच्या हंगामात, संघ डेक्कन चार्जर्स म्हणून नावलौकाला आला. गायत्री रेड्डी हैदराबादच्या फ्रँचायझी टीम डेक्कन चार्जर्सच्या मालकीण होत्या. २००८ मध्ये जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा वडिलांनी त्यांना संघ बांधणीस मदत केली आणि दुसऱ्या हंगामातच डेक्कन चार्जर्सने आयपीएलचे विजेतेपद जिंकले.
काव्या मारन आधी ही होती आयपीएलची OG क्रश
सनरायझर्स हैदराबादच्या मालकीणबाई काव्या मारनला कोणत्याही ओळखीची गरज नाही. काव्या अनेकदा सौंदर्याने आणि स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेते पण, तिच्या आधी आयपीएलमध्ये फक्त गायत्री रेड्डीबद्दलच चर्चा रंगायची, ज्यांनी अनेक वर्षे लोकांच्या मनावर राज्य केले. आता कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की गायत्री रेड्डी कोण आहे, चला तर मग जाणून घेऊ गायत्री रेड्डी कोण आहेत आणि त्यांचा आयपीएलच्या हैदराबाद संघाशी काय संबंध आहे.
कोण आहेत गायत्री रेड्डी, IPL काय कनेक्शन
आयपीएलच्या नवीन चाहत्यांनी कदाचित गायत्री रेड्डी किंवा डेक्कन चार्जर्सचे नाव ऐकले नसेल. याआधी हैदराबादचा संघ जेव्हा डेक्कन चार्जर्स म्हणून ओळखला जायचा तेव्हा गायत्री रेड्डी देखील अशाच चर्चेत असायच्या. डेक्कन चार्जर्सच्या मॅचदरम्यान स्टेडियमवरील कॅमेरा गायत्री यांची झलक नक्कीच कॅप्चर करायचा. गायत्री रेड्डी अनेकदा मैदानावर संघाला पाठिंबा देताना दिसल्या. त्यावेळी गायत्री रेड्डी आयपीएलमध्ये वर्चस्व गाजवायच्या इतकं की चाहतेही त्यांची झलक पाहण्यासाठी आतुर असायचे. काव्या प्रमाणेच गायत्री रेड्डी देखील सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घ्यायची.
What's Your Reaction?








