Fadnavis Vs Thakre : मुंबईबाबत उद्धव ठाकरेंना फडणवीसांचे ओपन चॅलेंज; म्हणाले, 'एक तरी काम...'

Mar 24, 2024 - 09:24
Mar 24, 2024 - 09:30
 0  42
Fadnavis Vs Thakre : मुंबईबाबत उद्धव ठाकरेंना फडणवीसांचे ओपन चॅलेंज; म्हणाले, 'एक तरी काम...'

Maharashtra Political News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या शब्दांनी सत्ताधारी नेत्यांना सडकून काढतात. शालजोडे मारत आपल्या टोमण्यांनी घायाळ करतात. शाब्दिक कोट्या करत सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या कायम निशाण्यावर असतात. यावर फडणवीसांनी त्यांचा टोमणे बहाद्दर असा उल्लेख केला आहे. तसेच फडणवीसांनी त्यांना विकासकामांना फाटा देऊन भलतेच काहीतरी बोलण्यात ते पटाईत असल्याचा टोलाही लगावला आहे.मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून, असे फडणवीसांनी म्हटल्याने ठाकरेंनी  त्यांच्यावर तोफ डागली होती. दिल्लीत असलेल्या फडणवीसांना यावर छेडले असता त्यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली. तसेच मुंबईतील विकासकामांवरून ठाकरेंना ओपन चॅलेंजही दिले. फडणवीस  म्हणाले, ठाकरे हे टोमणे बहाद्दर आहेत. त्यांना मी दिलेली ही उपमा ते सार्थ करून दाखवतात. त्यांनी विकासकामावर एकच वाक्य बोलून दाखवावे. 25 वर्षांत त्यांनी काय केले, याबाबत त्यांनी जाहीरपणे सांगावे. मी 25 कामे सांगतो. मुद्दाचे सोडून इतर गोष्टींवर बोलून हेडलाईन मिळवणे, एवढेच एक काम ठाकरे करत असतात, असा घणाघात फडणवीसांनी केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow