संसद रत्न खासदार श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे आज दर्यापूरात...

Oct 7, 2024 - 04:01
 0  44
संसद रत्न खासदार श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे आज दर्यापूरात...

दर्यापूर ता.प्रतिनिधी हरिदास खाडे

दर्यापूर - आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दिनांक ७ ऑक्टोबर रोजी शिंदे सेना दर्यापूर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्या मेळाव्याला संसद रत्न खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे आगमन होणार असल्यामुळे आयोजक कॅप्टन अभिजीत अडसूळ शिवसेना राष्ट्रीय सचिव माजी आमदार दर्यापूर तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जनसंवाद दौरा टप्पा क्रमांक चार मराठवाडा आणि विदर्भात दिनांक ७ व ८ऑक्टोबर व ९ ऑक्टोबर रोजी विधानसभा निहाय शिवसेना पदाधिकारी बैठक व कार्यकर्ता व मेळावा दिनांक अमरावती येथे ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत दर्यापूर विधानसभा शिवसेना पदाधिकारी बैठक तसेच अकरा वाजता दर्यापूर विधानसभा शिवसेना कार्यकर्ता मेळावा घेण्यात आलेला आहे. तरी या मेळाव्याला सर्व शिंदे सेना कार्यकर्ते महिला पदाधिकारी यांनी आवर्जून उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवावी अशी मागणी जिल्हाप्रमुख शिंदे सेना गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूर व अंजनगाव वाशी यांना कळविले आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow