शिवसेना एकच… बाकी मोदींच्या झाडाला आलेली बांडगुळं…संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे, अजित पवार यांना डिवचले !!

Oct 5, 2024 - 12:45
 0  20
शिवसेना एकच… बाकी मोदींच्या झाडाला आलेली बांडगुळं…संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे, अजित पवार यांना डिवचले !!

शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी शनिवारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी ही भाजपच्या हातातील बाहुले झाल्याचा आशय त्यांनी आपल्या टीकेतून मांडला. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तिकीट आता दिल्लीत फायनल होत असल्याचे संजय राऊत म्हणाले.

दिल्लीत आमचे तिकीट फायनल होत नाही. आमचे पक्षप्रमुख मुंबईत राहतात. मातोश्रीवर असतात. सर्व महाराष्ट्र मातोश्रीवर येतो. दिल्लीत शरद पवार गटाचे तिकीट कन्फर्म होत नाहीत. दिल्लीत शिंदे गटाचे तिकीट कन्फर्म होतात. दिल्लीत अजित पवार गटाचे तिकीट कन्फर्म होतात. कारण त्यांचे बॉस दिल्लीत असतात. आमची नाहीत. आमचे शिवसेना पक्षप्रमुख मुंबईत आहेत. आमचं सर्व काम मुंबईतून चालतं.

आरक्षणाचा मुद्दा राज्यातील संपवायचा असेल तर तामिळनाडूचा फॉर्म्युला आहे. ५० टक्क्यांच्यावर आरक्षण दिलं ते टिकलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलत आहेत. सर्वांना हळद लावत आहेत. तुलाही देतो सांगत आहे. त्यांच्या हातात काही नाही. मोदी आणि शाह यांच्या हातात आहे. दिल्लीतच त्यावर निर्णय होऊ शकतो. जे परवा शरद पवार आणि आता राहुल गांधी यांनी तेच सांगितलं आहे.

शिवसेना एकच. बाकी सर्व मोदींच्या झाडाला आलेली बांडगुळं आहेत. जुनी नवी असं काही नाही. शिंदे आणि त्यांचा फुटलेला गट हा भाजपच्या झाडाला लागलेलं बांडगुळ आहे. मोदी आज आले. मोदींचा फोटो पोस्टरवर मोठा आहे पण बाळासाहेबांचा फोटो छोटा आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय पोस्टरवर बाळासाहेबांशिवाय कुणाचा फोटो नव्हता. त्यांच्या फोटोवर मोदी आणि शाह यांचे फोटो आहेत. ही शिवसेना नाही. त्यांना शिवसेना म्हणणं हा बाळासाहेबांचा अवमान आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow