शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
दै. जागर मराठी
प्रतिक कुऱ्हेकर
अकोला :- सततच्या पावसाने सोयाबीन पीक नुकसानीच्या अनुषंगाने महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोला जिल्ह्यातील शिवापूर येथे शेसततच्या पावसाने सोयाबीन पीक नुकसानीच्या अनुषंगाने महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोला तालुक्यातील शिवापूर येथे शेतीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शिवापूर येथील शेतकरी गजानन जळमकार यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी केली व गावातील शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली.
शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
What's Your Reaction?








