भाजप उमेदवारावर दगडफेक, बचावासाठी कार्यकर्त्यांसह स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं, पाथर्डीत तणाव !!

Nov 21, 2024 - 06:31
 0  32
भाजप उमेदवारावर दगडफेक, बचावासाठी कार्यकर्त्यांसह स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं, पाथर्डीत तणाव !!

अहिल्यानगर | राज्यात विधानसभा निवडणुका पार पडत असताना अनेक ठिकाणी पैसे वाटप, मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पाहिली जाते. यामध्ये प्रामुख्याने भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, अपक्ष उमेदवार जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्यातील लढत पाहायला मिळाली.
याच तालुक्यातील संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणारे मतदान केंद्र हे पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी या ठिकाणी असून या ठिकाणच्या मतदान केंद्रावर मोनिका राजळे या पाहणी करण्यासाठी गेल्या असतात तेथे काही जमावाने त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी जमावापासून वाचण्यासाठी मोनिका राजळे यांनी कार्यकर्त्यांसह मतदान केंद्राच्या ठिकाणी असलेल्या एका खोलीत स्वतःला बंद करून घेतलं. सुमारे दोन तास त्यांनी स्वतःला आणि कार्यकर्त्यांना त्या खोलीमध्ये बंद करून घेतलं होतं. त्यानंतर पोलीस प्रशासनाशी संपर्क करून त्यांनी पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी मागवला.उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त बोलवल्यानंतर दोन तासाच्या काळानंतर त्या कार्यकर्त्यांसह खोलीबाहेर आल्या. पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांची सुटका करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow