फुले दाम्पत्य सन्मान रॅलीस लाखोच्या संख्येने यावे !! संदीप भुस्कट भिडेवाडा ते फुलेवाडा फुले दाम्पत्य सन्मानदिन महारॅलीचे आयोजन!!
अकोट | १ जानेवारी २०२५ रोजी "भिडेवाडा ते फुलेवाडा" फुले दांपत्य सन्मान दिन महारॅली चे माळी महासंघा च्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. तरी या महारॅलीत माता भगिनींसह सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे १ जानेवारी १८४८ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा येथे सुरू केली त्यावेळी फुले दांपत्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या याचा इतिहास आपणा सर्वांना ज्ञात आहेच काळाच्या ओघात भिडेवाडाकडे शासनासह सर्वांचे दुर्लक्ष होत गेले परंतु दहा वर्षांपूर्वी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी भिडेवाडा ते फुलेवाडा अशी १ जानेवारी फुले दांम्पत्य सन्मान दिन महारॅली काढत या विषयाकडे शासनासह सर्व समाजाचे लक्ष वेधले आणि भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी केली त्याचे फलित असे झाले की शासनाने याकरिता ५० कोटींचा निधी मंजूर केला आणि भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला या राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन पद्धतीने केले या समारंभाला अविनाश ठाकरे यांनाही उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले सद्यःस्थितीत या राष्ट्रीय स्मारकाचे काम वेगाने सुरू झाले आहे त्यामुळे एकूणच महारॅली विविध सामाजिक संघटना सामाजिक व राजकीय नेतेमंडळी आणि सर्व समाज बांधव यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा हा परिपाक म्हणावा लागेल आपणास विनंती आहे की सर्व समाज बांधव व माता भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फुले दांपत्यांना अभिवादन करण्यासाठी १ जानेवारी २०२५ रोजी भिडेवाडा पुणे येथे सकाळी १० वाजता उपस्थित रहावे
रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अविनाश ठाकरे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण तिखे महारॅलीचे आयोजक संतोष हिरामण भुजबळ दीपक जगताप रवींद्र अंबाडकर नानासाहेब कांडलकर काळुराम अण्णा गायकवाड वनिता लोंढे कैलास महाजन भारत माळी संतोष जमदाडे शुभांगी लोंढे प्रा. नामदेव कोकोडे बापू खलाणे पोपट माळी डॉ. श्रीकृष्ण गोरडे चंद्रशेखर दरवड आसाराम वीरकर संघटन सचिव मुरलीधर भुजबळ मुकुंद पोटदुखे राजेश जावरकर अतुल क्षीरसागर दिनेश टाकरखेडे देवंनाथ जाधव संदीप भुस्कट केशव दहीकर शरद पेठकर डॉ.संजय घाटे चक्रधर टाकरखेडे शंकर वाघमारे जगन्नाथ लडकत डॉ. प्रमोद तांबे प्रकाश माळी लक्ष्मण ढवळे महाराष्ट्र प्रदेश यांनी केले.
What's Your Reaction?








