निराधाराची सेवा हीच ईश्वर सेवा,मदत नव्हे कर्तव्य:रणजीत पाटील..... भूमी फाऊंडेशन तर्फे भव्य उज्वला गॅस वाटप....

Mar 10, 2024 - 15:09
 0  110
निराधाराची सेवा हीच ईश्वर सेवा,मदत नव्हे कर्तव्य:रणजीत पाटील.....  भूमी फाऊंडेशन तर्फे भव्य उज्वला गॅस वाटप....
निराधाराची सेवा हीच ईश्वर सेवा,मदत नव्हे कर्तव्य:रणजीत पाटील.....  भूमी फाऊंडेशन तर्फे भव्य उज्वला गॅस वाटप....

अकोट ता.प्रतिनिधी

 अकोट येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदरणीय प्रधानमंत्री,विश्वनेते नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात गोर-गरीब व सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणार्‍या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून खर्‍या अर्थाने आजचा जागतिक महिला दिन साजरा केला ,असे रणजीत पाटील यांनी आपल्या भाषणातून कु.चंचल यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्यात.समाजातील दिन-दुबळ्या,गोर गरीब समाजाशी बांधिलकी आवश्यक आहे.

समाजातील प्रत्येक घटक हा अंतोदय झाला पाहिजे या साठी कु.चंचल पितांबरवाले यांची सतत धडपड सुरू असते.अकोट परिसरातील उज्वला गॅस व अपंगाचे पगार,निराधार चे पगार,निराधारांचे समस्या सोडवण्यासाठी चंचल पितांबरवाले ह्या धावपड करत असतात.त्याच अनुषंगाने ८ मार्चला महिला दिनाच्या औचित्य साधून भूमी फाऊंडेशन आयोजित प्रधानमंत्री उज्वला गॅस वाटप करण्यात आले.१५० उज्वला लाभार्थ्यांना शेगडी आणि गैस सिलेंडर वितरित करण्यात आले.कर्तृत्ववान महिलांचा तसेच शहापूर येथे ज्या महिलांनी पुढाकार घेवून दारुबंदी केली त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री रणजित पाटील यांची उपस्थिती होती. तसेच मंचावर अकोट शहरचे ठाणेदार तपणजी कोल्हे,नगरपालिका मुख्याधिकारी डॉ.नरेंद्र बेंबरे,डॉ. गुंजन वालसिंगे,शोभाताई बोडखे,संजय आठवले,ऍड.विशाल गणगणे,डॉ.अरविंद लांडे,मेलोडी ग्रुपचे अध्यक्ष योगेश वर्मा,विष्णू बोडखे,आशुतोष काटे,राजू शेळके,शहापूरचे सरपंच विनायक सुरत्ने,भूमी फाऊंडेशच्या अध्यक्षा कु.चंचल पितांबरवाले याची उपस्थिती होती.श्रावण बाळ,संजय गांधी योजना,राष्ट्रीय अर्थसहाय्य अपंग योजना यांचे पगार चालू करण्यासाठी खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात व काही निराधार लोकं योजनेपासून वंचित राहतात म्हणून त्यांनी चंचल पितांबरवाले यांचाशी संपर्क करावे असे आवाहन शोभाताई बोडखे यांनी केले.आज अकोट येथे कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलावर्गाची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता हिंमत दंदी,जितेश गलांडे,किर्तीकुमार पितांबरवाले, चिराग श्रावगी,सलमान यांनी केले.कार्यक्रम संगीतदार करण्याकरिता कन्हेय्या गौर,सिद्धार्थ वानखडे,राजेंद्र तेलगोटे,गिरीश काळे,अविनाश पालेकर,दीपक तळोकार,प्रताप सोळंके,महिंद्रा कैसर यांनी केले.बहारदार संचालन प्रविणकुमार पुडगे यांनी केले तर आभार कु.चंचल पितांबरवाले यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow