तीन तालुक्यात अध्यक्षपदी आ. राजेश पवार, पूनम पवार, डॉ. विक्रम देशमुख यांची नियुक्ती!!
दैनिक जागर मराठी
उमरी :उमरी धर्माबाद नायगावं ह्या तीन तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने शासनाच्या ५० टक्के महत्व पूर्ण योजना शासनाच्या वतीने राबविल्या जातात अशा महत्व पूर्ण संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्ष पदी आ. राजेश पवार (नायगावं), पूनम राजेश पवार (धर्माबाद) तर डॉ. विक्रम देशमुख तळेगावकर यांची (उमरी) च्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ह्या नियुक्त्या आ. राजेश पवार यांच्या शिफारशीने पालक मंत्री ना. अतुल सावे यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या स्वाक्षरीने करण्यात आल्या आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबाना शासनाची मदत मिळते. या योजनेचा लाभ १८ ते ६५ वयोगटातील लोकांना प्रामुख्याने होतो. यांत निराधार महिला, विधवा महिला, पुरुष, अनाथ मुले, अपंग व्यक्ती, क्षय रोग, कर्क रोग, एडस अशा गंभीर आजाराणी ग्रस्त व्यक्तींना लाभ मिळतो. यां योजनेतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा मानधन स्वरूपात रक्कम दिली जाते. या योजनेच्या मानधनात शासनाने मोठ्या प्रमाणात अलीकडेच वाढ केली आहे. पात्र लभार्थ्यांना वयाचा दाखला, शाळासोडल्याचा दाखला, अपंगत्व असल्यास शल्य चिकिस्तकाचा दाखला फक्त ह्या दोन नींकषावर ह्या योजनेचा फायदा दिला जातो.
What's Your Reaction?








