डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रॅली व गायन कार्यक्रम!!

Dec 10, 2025 - 14:14
 0  8

दैनिक जागर मराठी


पांढरकवडा : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत जयंती उत्सव समितीमार्फत अभिवादनपर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील मुख्य बाजारपेठ आणि विविध मार्गांवरून ही रॅली कॅन्डल मार्च काढून शांततेत पार पडली. रॅलीनंतर आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला स्मरण व अभिवादन करण्यासाठी गायन कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. समाजातील प्रज्ञा कुंभारे, सिद्धार्थ कांबळे, संभा मडावी, कोमल जमिनकर, घोडेस्वार मॅडम, रवी शेंडे या कलावंतांनी बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देणारी गीतं सादर केली. उपस्थितांनी कडाक्याचा थंडीत शांतपणे भीमगीत ऐकून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. या संपूर्ण कार्यक्रमासाठी समाज बांधवांकडून सहकार्य करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विनय जनपदक, अमर वंजारी, श्याम आक्केवार, देविदास जंगलवार, पवन खेडकर, प्रज्वल खोब्रागडे, गणेश वावरे, विशाल उडकांडे, रवी शेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. गायन कार्यक्रमाचे संचालन ताकसांडे सर तर आभार प्रदर्शन अमर वंजारी यांनी केले. उपस्थित नागरिक व पाहुण्यांसाठी चहा-पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था सागर मुजमुले, अशोक भुजाडे व दिनेश वनकर यांचेकडून करण्यात आली. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक-युवती व मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले. शहरभरात सामाजिक एकोपा व विचारजागृतीचा सुंदर संदेश देत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow