सात लाख 60 हजार 160 रुपयाचा गुटखा जप्त ; आरोपी अटकेत !!
दैनिक जागर मराठी
मारोती सोनवणे
अमरावती : बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपी राजू शहा उर्फ कदिर शहा (वय 50, रा. गधेगाठपुरा, मोर्शी) याला अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन एकूण सात लाख 60 हजार 160 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. मिळालेला माहितीनुसार, आरोपी राजू शहा उर्फ कदिर शहा (वय 50, रा. गधेगाठपुरा, मोर्शी) हा टाटा इंडिगो गाडी क्रमांक एमएच 31 डीके 2381 ने गुटखा, सुगंधित तंबाखू घेऊन अमरावती कडे येत होता. त्याला बोथरा नर्सरी, हॉटेल लँडमार्क ते अकोला टी पॉइंट जवळ वाहन थांबवून त्याची झडती घेतल्यास सुगंधित तंबाखू मस्तानी निळे पॅकेट किंमत दोन लाख 16 हजार रुपये, सुगंधित तंबाखू मस्तानी गोल्डन पॅकेट किंमत 12 हजार 480 रुपये, गुटखा नजर ब्रँड किंमत 31 हजार 680 रुपये तसेच टाटा इंडिगो गाडी क्रमांक एमएच 31 डीके 2381 किंमत पाच लाख रुपये असा एकूण सात लाख 60 हजार 160 रुपयेचा माल जप्त करण्यात आला. सदर जप्त मुद्देमाल व आरोपी राजु शाह कदीर शाह वय 50 वर्ष रा. गधेगाटपुरा, मोर्शी जि. अमरावती यास पुढील कारवाईसाठी गजानन गोरे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते लेखी तक्रार देवुन पोलीस ठाणे बडनेरा यांचे ताब्यात आले होते. सदर कारवाई ही पोलीस आयुक्त अरविंद चावरीया, पोलीस उपआयुक्त (परीमंडळ-01) गणेश शिंदे, उपआयुक्त (मुख्यालय) रमेश धुमाळ, पोलीस उपआयुक्त (परीमंडळ-02) श्याम घुगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे विभाग) शिवाजी बचाटे, वरीष्ठ पोलीस निराक्षक संदिप चव्हाण यांचे नेतृत्वाखाली सह पोलीस निरीक्षक अमोल कडु, पोहवा सतिष देशमुख, फिरोज खान, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, पोलीस नाईक नाझीमोद्दीन सैय्यद, पोलीस रणजित गावंडे चालक अमंलदार प्रभात पोकडे, गुन्हे शाखा यांनी केली आहे.
What's Your Reaction?








