Sushma Andhare : शिंदे, फडणवीस साहेब महाराष्ट्रातील एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा
शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावर ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, गद्दार गँगच्या अनेक लोकांनी कालच्या निकालानंतर जल्लोष करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. घराणेशाहीवर बोलायचं असेल तर शिंदेंनी श्रीकांत शिंदेंना राजकारण सोडून मेडीकल प्रॅक्टीसमध्ये स्वतला सिद्ध करायला सांगा
तुमच्यात जर खरच सत्य आहे, हिंमत आहे, कर्तृत्व आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला स्विकारलंय असं वाटत असेल तर एक निवडणूक बँलेट पेपरवर घेऊन दाखवा. शिंदे, फडणवीस साहेब महाराष्ट्रातील एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा महाराष्ट्र तुमची लायकी दाखवेल. असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
What's Your Reaction?