Sharad Mohol | मुळशीतच झालं होतं प्लॅनिंग, शरद मोहोळ हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर

Jan 11, 2024 - 09:20
 0  36
Sharad Mohol | मुळशीतच झालं होतं प्लॅनिंग, शरद मोहोळ हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर
Sharad Mohol | मुळशीतच झालं होतं प्लॅनिंग, शरद मोहोळ हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर

शरद मोहोळचा (Sharad Mohol) मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने आपल्या साथीदारांची मदत घेऊन गोळीबार केला होता. त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्याने मोहोळचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. आता आणखी दोन जणांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रधार नेमका कोण?

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धनंजय वटकर (रा. कराड) आणि सतीश शेडगे (रा. मुळशी)या दोन आरोपींना अटक केल्याचं समजतं आहे. याच दोघांनी शरद मोहोळला (Sharad Mohol) मारण्यासाठी पिस्तुल पुरवल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आहे.

आतापर्यंत साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, अमित कानगुडे, चंद्रकांत शेळके, नामदेव कानगुडे, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले या आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. शरद मोहोळ प्रकरणात रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. या घटनेमागे कुणीतरी तिसराच सूत्रधार असल्याचं म्हटलं जात आहे. नामदेव कानगुडेच सुत्रधार असल्याची शंका सध्या व्यक्त केली जात आहे. तरी पोलिसांकडून याबाबत अधिकची चौकशी सुरू आहे.

शरदला मारण्यासाठी मुन्नाचा पिस्तुल चालवण्याचा सराव

शरद मोहोळला मारण्यासाठी त्याच्या जवळचाच व्यक्ती म्हणजेच मुन्ना पोळेकरने कट रचला होता. मुन्नानेच शरदवर मागून गोळ्या झाडल्या होत्या. वीस वर्षीय मुन्ना हा शरदचा जवळचा मित्र होता. मात्र त्यानेच शरदची हत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने मुळशीमध्ये तीन ठिकाणी पिस्तुल चालवण्याचा सराव केला होता. त्याने शरदला एकट्यात मारण्याचाही डाव रचल्याचेही  समोर येत आहे. त्यामुळे पोलीस आता सर्व कारणांचा तपास लावत आहे. पोलीस कोठडीत असलेल्या सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow