Mirzapur 3 : मिर्झापूर सीझन 3 बाबत मोठी अपडेट आली समोर

Feb 29, 2024 - 17:50
 0  17
Mirzapur 3 : मिर्झापूर सीझन 3 बाबत मोठी अपडेट आली समोर

ओटीटीवर सर्वाधिक गाजलेली वेब सीरीज म्हणजे मिर्झापूर. मिर्झापूर आणि मिर्झापूर 2 या वेबसिरीजनंतर आता सगळ्यांनी प्रतिक्षा आहे ती मिर्झापूर 3 या वेब सीरीजची. मिर्झापूर सीझन 3 बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. त्या संदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे वेब सीरिजची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार आहे. मिर्झापूर २ मध्ये कालेन भैय्या म्हणजेच पंकज त्रिपाठीचा मुलगा मुन्ना त्रिपाठी म्हणजेच दिव्येंदू शर्मा याचा मृत्यू दाखवण्यात आला होता. तेव्हापासून वेब सिरीजचे प्रेक्षक मिर्झापूर ३ ची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनबाबत बातमी आहे की, कलेन भैय्याचा मुलगा यात पुन्हा एंट्री करणार आहे.

मिर्झापूर 3 कधी प्रदर्शित होणार याबाबतही बातम्या समोर आल्या आहेत. GQ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मिर्झापूर 3 मार्चच्या शेवटच्या आठवड्यात Amazon प्राईम वर रिलीज होऊ शकतो. मिर्झापूर 3 च्या प्रदर्शनाची तारीख अद्याह समोर आलेली नाही. निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण मिर्झापूर सीझन 3 मध्ये पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा ​​कालिन भैयाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अली फजल पुन्हा एकदा गुड्डू पंडितच्या भूमिकेत दिसणार आहे. बदला घेण्यासाठी तो पुन्हा एकदा सज्ज आहे. दिव्येंदू देखील मुन्ना त्रिपाठीच्या भूमिकेत मिर्झापूर 3 मध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे. रसिका दुग्गल बीना त्रिपाठी आणि श्वेता त्रिपाठी शर्मा गजगामिनी उर्फ ​​गोलू गुप्ताच्या भूमिकेत दिसणार आहे. मिर्झापूर आणि मिर्झापूर 2 या दोन्ही वेब सिरीज जगभरात चांगल्याच गाजल्या होत्या त्यामुळे तिसऱ्या पार्टची सगळ्यांना उत्सूकता आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow