Kisan Vikas Patra Yojna l फायद्याची बातमी! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवल्यास होणार दुप्पट
Kisan Vikas Patra Yojna l केंद्र सरकार नवनवीन योजनांवर जास्त भर देतात. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास अडचणीच्या काळात ते उपयोगी ठरतात. पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना आहेत त्यामध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास अनेक फायदे होतात. अशाच फायद्याच्या किसान विकास पत्र योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
किसान विकास पत्र योजना :
पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांपैकी एक असलेली किसान विकास पत्र योजना ही अत्यंत फायद्याची योजना आहे. ही योजना निश्चित दराची छोटी बचत योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागते. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसची ही योजना शेतकऱ्यांसाठी तयार केलेली योजना आहे.
किसान विकास पत्र योजनेमध्ये तुम्ही जमा केलेल्या रकमेवर वार्षिक 7.5 टक्के दराने व्याज मिळत आहे. तुम्ही या योजनेत 9 वर्ष आणि 7 महिने गुंतवणूक केली तर तुमचे पैसे दुप्पट होतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला या योजनेमध्ये तुमच्या बालकाचे खाते उघडायचे असेल तर त्याचे पालक खाते उघू शकतात.
Kisan Vikas Patra Yojna l किसान विकास पत्र योजनेची अट :
सर्वात महत्वाचं म्हणजे किसान विकास पत्र योजनेत तुम्हाला एकल किंवा संयुक्त खाते उघडण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्यासाठी एक अट घालण्यात आली आहे. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त फक्त 3 प्रौढ व्यक्तींचा समावेश केला जाऊ शकतो.
पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेत तुम्ही किमान 1000 रुपये गुंतवू शकता तर जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. किसान विकास पत्र योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या योजनेत कितीही खाती उघडता येऊ शकतात.
किसान विकास पत्र योजनेत (Kisan Vikas Patra Yojna) जर तुमच्या खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूनंतर खाते त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाकडे हस्तांतरित केले जाते. तसेच जर खातेधारकाच्या नॉमिनीचा देखील मृत्यू झाला तर कायदेशीरपणे न्यायालयाच्या आदेशानुसार खाते हस्तांतरित केले जाते.
What's Your Reaction?