IND vs AFG T20 | पहिल्या सामन्यातून Virat Kohli ची अचानक माघार; द्रविडनं सांगितलं कारण

Jan 11, 2024 - 09:22
 0  24
IND vs AFG T20 | पहिल्या सामन्यातून Virat Kohli ची अचानक माघार; द्रविडनं सांगितलं कारण
IND vs AFG T20 | पहिल्या सामन्यातून Virat Kohli ची अचानक माघार; द्रविडनं सांगितलं कारण

IND vs AFG T20 | आजपासून भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेला सुरूवात होत आहे. सलामीचा सामना मोहाली येथे खेळवला जाईल. भारताच्या ट्वेंटी-20 संघात मोठ्या कालावधीनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे पुनरागमन झाले आहे. दोन्ही स्टार खेळाडूंना पुन्हा एकदा क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. पण, विराट कोहलीची (Virat Kohli) झलक पाहण्यासाठी सर्वांना दुसऱ्या सामन्याची वाट पाहावी लागेल. कारण किंग कोहलीने सलामीच्या सामन्यातून माघार घेतली आहे.

IND vs AFG T20 आजपासून थरार

मोहालीत खेळल्या जाणार्‍या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्याच्या एक दिवस आधी आयोजित पत्रकार परिषदेत प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराट कोहली पहिल्या सामन्याला मुकणार असल्याचे सांगितले. विराट कोहली त्याच्या वैयक्तिक कारणामुळे अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला सामना खेळणार नाही.

Virat Kohli ची पहिल्या सामन्यातून माघार

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 2022 च्या ट्वेंटी-20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-20 संघात स्थान मिळाले, पण पहिल्या ट्वेंटी-20 सामन्याच्या एक दिवस आधी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराट कोहली पहिल्या सामन्याला मुकणार असल्याचे उघड केले. वैयक्तिक कारणामुळे कोहलीने माघार घेतली असल्याचे द्रविड यांनी सांगितले.

अफगाणिस्तानविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत नेहमीच भारताचे वर्चस्व राहिले आहे. विराटचा देखील अफगाणिस्तानविरूद्ध चांगला विक्रम आहे. कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध तीन ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 172 च्या स्ट्राईक रेटने 172 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शानदार शतक आणि एक अर्धशतक झळकावले.

तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, तिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मुकेश यादव, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.

अफगाणिस्तानचा संघ –

इब्राहिम झाद्रान (कर्णधार), रहमतुल्लाह गुरबाज, हशमतुल्लाह झाझाई, इब्राहिम अलिखिल, रहमत शाह, मोहम्मद नबी, एन. झाद्रान, के. जनात, ए. ओमरजाई, एस. अश्रफ, एम. रहमान, एफ. फारुखी, एफ. मलिक, नवीन उल हक, एन. अहमद, एम. सालेम, क्यू अहमद, राशिद खान आणि गुलबदीन नईब.

मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना, 11 जानेवारी – मोहाली
दुसरा सामना, 14 जानेवारी – इंदूर
तिसरा सामना, 17 जानेवारी – बंगळुरू

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow