BSNL युजर्सना ‘अच्छे दिन’, 35 हजार 4G साईट्स लाईव्ह, नेटवर्क होणार वेगवान!!
बीएसएनएलचे प्रत्येक गावात नेटवर्क
बीएसएनएलचे मोबाइल टॉवर भारतातील गावांना नेटवर्क पुरवण्याचे काम करतील. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी जून 2025 पर्यंत 1 लाख 4G साइट्स लाइव्ह करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत बीएसएनएलचे प्रत्येक गावात जाळे म्हणजेच नेटवर्क असणार आहे.
‘स्वस्त इंटरनेट पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न’
मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे म्हणणे आहे की, बीएसएनएल शहरांबरोबरच खेड्यांमध्येही नेटवर्क मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात स्वस्त इंटरनेट पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रीय मंत्री शिंदे म्हणाले की, लाइव्ह 1 लाख 4G टॉवर्सद्वारे मोबाइल सेवा सुधारली जाईल. तसेच नवीन सेवा सुरू करण्यात येणार आहेत.
What's Your Reaction?








